Viral Video : डोक्यावर पदर घेत सिलिंडरच्या टाकीवर उभी राहून नाचत होती; तोल गेला आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच पाहा

Women Dance On Gas Cylinder : महिला एखाद्या संस्कारी मुलीप्रमाणे डोक्यावर पदर घेऊन उभी आहे. आता रील व्हिडिओ बनवण्यासाठी या महिलेने चक्क सिलिंडरवर उभे राहण्याची डेरींग केली आहे.
Women Dance On Gas Cylinder
Viral VideoSaam TV

फेमस आणि व्हायरल होण्यासाठी आजकाल कोण काय करेल याचा काही नेम नाही. प्रसिध्दीसाठी व्यक्ती जीव धोक्यात घालून स्टंट करतात. सध्या रील व्हिडीओची फार मोठी क्रेझ आहे. रील व्हिडिओमध्ये काहीतरी हटके आणि अतरंगी करावं यासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही करामती करताना दिसते.अशात एका महिलेने तर वेडेपणाची हद्दच पार केली आहे.

Women Dance On Gas Cylinder
Gas Cylinder Blast : गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन तीन घरांचे नुकसान; कुटूंबाचा संसार उघड्यावर

या महिलेने एका सिलिंडरच्या टाकीवर उभे राहून डान्स केला आहे. तिचा डान्स पाहून सगळेच थक्क झालेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला आपल्या घरामध्ये अंगणात सिलिंडरची टाकी घेऊन आली आहे. तिने लाल आणि पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

ही महिला एखाद्या संस्कारी मुलीप्रमाणे डोक्यावर पदर घेऊन उभी आहे. आता रील व्हिडिओ बनवण्यासाठी या महिलेने चक्क सिलिंडरवर उभे राहण्याची डेरींग केली आहे. ती सिलिंडरच्या टाकीवर फक्त उभी नाही तर डान्स सुद्धा करत आहे. तिच्या डान्सचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

नाचता नाचता या महिलेचा तोल जातो आणि ती जोरदार खाली पडते. खाली पडल्यावर तिच्या डोक्याला आणि तोंडाला जोरदार लागलं असणार असं व्हिडिओ पाहता समजत आहे. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडिओवर अनेक कमेंट केल्यात. कोणी या महिलेला वेडी म्हटलं आहे तर कोणी यावर संताप व्यक्त केला आहे. काही व्यक्तींनी महिलेची काळजी देखील व्यक्त केलीय.

सोशल मीडियावर या आधी देखील असे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. रील व्हिडीओ बनवणे आणि स्टंट करणे यामध्ये सध्याची तरुण पिढी वाया जात असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी एक महिला सिलिंडरची टाकी डोक्यावर घेऊन नाचत होती. तो व्हिडिओ देखील असाच प्रचंड व्हायरल झाला होता.

Women Dance On Gas Cylinder
Gas Cylinder Blast : होळीच्याच दिवशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर; गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन एकाच मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com