Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

WhatsApp 'NO' Message Scam: आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...तुम्ही व्हॉट्सअॅपवर NO लिहाल तर अकाऊंटमधून पैसे गमवाल...होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली... त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात...
WHATSAPP 'NO' MESSAGE SCAM FACT CHEC
WHATSAPP 'NO' MESSAGE SCAM FACT CHECsaam tv
Published On: 

तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुम्ही सावध व्हा...कारण, व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून गंडा घालणारी टोळी सक्रिय झालीय असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...तुम्हाला बँकेकडून पैसे कट झाल्याचा मेसेज पाठवला जातो...आणि त्यावर तुम्ही NO असं उत्तर दिलं तर तुमचे पैसे जाऊ शकतात...असा दावा करण्यात आलाय...पण, या दाव्यात तथ्य आहे का...? या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हॉट्सॲपवर NO लिहू नका, तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. व्हॉट्सॲपवरील एका छोट्या चुकीमुळे तुम्हाला तुमच्या कष्टाचे पैसे गमवावे लागू शकतात.

हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय...त्यामुळे मेसेज वाचून संभ्रम निर्माण झालाय...असे मेसेज पाहून कोणीही घाबरून जाऊ शकते. लोकांना वाटते की त्यांच्या बँक खात्यातून खरोखरच पैसे वजा झाले आहेत. या घाबरलेल्या अवस्थेत, ते विचार न करता मेसेजला उत्तर देतात.त्यामुळे त्यामुळे यामागचं सत्य काय आहे हे जाणून घ्यायला हवं...आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी केली...आणि सायबर एक्सपर्ट यांच्याकडूनच ही फसवणूक कशी होते हे जाणून घेतलं...

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

गुन्हेगार अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲप मेसेज पाठवतात

तुमच्या बँक खात्यातून व्यवहार झाल्याचं दाखवतात

खात्यातून पैसे कट झाल्याचा दावा करतात

त्यानंतर फसवणूक करणारे दुसरा मेसेज पाठवतात

व्यवहार केला नसल्यास NO असे उत्तर द्या असं सांगतात

हैदराबाद पोलिसांनी हे रॅकेट उघडकीस आणलंय...

त्यामुळे ही फसवणूक टाळण्यासाठी काय करावे हेही पाहा...जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून बँक व्यवहारासंदर्भात मेसेज आला, तर घाबरून जाऊ नका...YES किंवा NO असे उत्तर देऊ नका...सर्वप्रथम, तुमच्या बँकेच्या अधिकृत ॲपवर किंवा नेट बँकिंगवर जाऊन तुमच्या खात्यातून खरोखरच पैसे वजा झाले आहेत की नाही हे तपासा...तसंच 1930 हेल्पलाईनवर कॉल करा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार दाखल करा...त्यामुळे आमच्या पडताळणीत व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल तर अकाऊंटमधील पैसे गमवाल हा दावा सत्य ठरलाय...ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com