Viral Video: याला म्हणतात माणुसकी! सहा तास ग्रीलच्या जाळीत अडकलं मांजरीचं डोकं, गावकऱ्यांनी वाचवला जीव | VIDEO

बाल्कनीतील ग्रीलमध्ये अडकलेली मांजर तब्बल ६ तासांनी गावकऱ्यांनी वाचवली. ही माणुसकी पाहून प्रत्येकाला अभिमान वाटेल. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Viral Video
Cat Rescue VideoSaam Tv
Published On

प्राणी हे मुके असले तरी त्यांना प्रेमाची भावना समजते. अनेकजण घरात प्राणी पाळतात आणि त्यांच्या कुटुंबाचाच भाग बनवतात. सोशल मीडियावर प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होतात. प्राण्याचे हे व्हिडीओ कधी मजेशीर असतात तर कधी आश्चर्यकारक असतात. सध्या सोशल मीडियावर असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे जे पाहून तुम्हालाही धक्काच बसेल.

Viral Video
Kobra Viral Video: भलामोठा क्रोबा पकडल्यानंतर जेव्हा हातातून पुन्हा निसटतो, तेव्हा काय घडतं? धडकी भरवणारा Video

प्राण्यांवर तुम्ही एकदा प्रेम केले की ते देखील तुमच्यावर प्रेम करतात. प्राणी हे मुके असले तरी त्यांनादेखील भावना असतात. कुत्रा, मांजर हे प्राणी पाळण्याची अनेकांना आवड असते. त्यांच्यासोबत खेळणे, राहणे हे अनेकांना आवडते आणि काहीदिवसांनी हे प्राणी त्यांच्या कुटुंबाचाच भाग बनतात. पाळीव प्राण्यांना बाल्कनीत खिडकीतून बाहेरचे पाहण्याची सवय असते. मात्र असच करताना एक मांजर बाल्कनीत ग्रीलच्या जाळीत अडकली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बाल्कनीत ग्रीलच्या जाळीमध्ये या माजंरीचे डोके अडकले आहे.

व्हिडीओमध्ये ते मांजरीचे डोके अडकल्याने ती ओरडताना दिसते आहे. दरम्यान तेथून येणाऱ्या जाणाऱ्यांना जेव्हा हे समजले तेव्हा ह्या मांजरीचे अडकलेले डोके बाहेर काढण्यात आले आहे.६ तास व्यक्ती मांजराचे डोके त्या ग्रीलच्या जाळीमध्ये अडकले होते. धारदार शस्त्राने ग्रील कापून माजंरीचे डोके हळुवारपणे काढण्यात यश आले आहे.

@sarpmitra_akshay_koli या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. हा व्हायरल व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत. एक युजर म्हणतो, माणुसकी आहे अजून जिवंत तर आणखी एकाने, खूप बरं वाटलं बघून की पिल्लू सुखरूप पणे वाचला असं म्हटलं आहे.

Viral Video
Viral Video: 'स्वप्न हे स्वप्नच राहिलं...' ९० च्या दशकातली ही वस्तू पाहून तुम्हालाही आठवेल बालपण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com