Kobra Viral Video: भलामोठा क्रोबा पकडल्यानंतर जेव्हा हातातून पुन्हा निसटतो, तेव्हा काय घडतं? धडकी भरवणारा Video

Kobra Rescue Viral Video: बुलढाण्यात कोब्रा साप रेस्क्यू करताना सर्पमित्राच्या हातातून निसटतो आणि दुचाकीच्या चैन कव्हरमध्ये लपतो. दोन तासांच्या प्रयत्नानंतर अखेर साप पकडण्यात यश येतं.
Viral News
Kobra Viral VideoSaam Tv
Published On

सापाचं नुसतं नाव जरी काढलं तरी अंगाला काटा मारतो त्यात कोब्रा जातीचा साप म्हटलं की शरीर थरथर कापायलाच लागतं. पावसाळ्यात साप हे बिळातून बाहेर येतात आणि मानवी वस्तीत दिसतात. सोशल मीडियावर देखील पावसाळ्यात मानवी वस्तीत साप दिसल्याच्या अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. असाच एक कोब्रा सापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहून तुमचाही थरकाप उडेल!

Viral News
Viral News: रिल्स बनवणाऱ्यांना मिळणार 5 हजार रुपये, काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये घराच्या बाजूलाच एक कोब्रा दिसतो आहे. या सापाला पकडण्यासाठी सर्पमित्रांना मोठे प्रयत्न करावे लागले आहेत.मात्र कोब्रा पकडल्यानंतर पुन्हा तो हातातून निसटतानाचा हा व्हिडीओ आहे.

बुलढाणा तालुक्यातील लखन गाडेकर याच्या घराशेजारी हा संपूर्ण प्रकार घडला आहे. कोब्रा दिसल्यानंतर लखन गाडेकर यांनी सर्पमित्राला कोब्रा पकडण्यासाठी बोलावले आहे. दरम्यान सर्पमित्रांना या कोब्रा सापाला पकडण्यात यश देखील आलं आहे. मात्र कोब्रा असा फणा काढून उलटा सुलटा हातातच फिरत होतो अशातच पकडलेला कोब्रा सर्पमित्राच्या हातातून पुन्हा निसटून पळ काढतो आहे. त्यांच्याच दुचाकीत जाऊन लपला.

कोब्रा ला शोधण्यासाठी सर्पमित्रांना पुन्हा जीवाची पराकाष्ठा करावी लावली, शेवटी कोब्रा दुचाकीच्या चैन कव्हर मध्ये अडकलेला दिसतो आहे. मात्र त्याला काढायचे कसे , हा प्रश्न सर्पमित्रांना पडला होता. त्यांनी मेकॅनिक बोलावला मात्र तो सुद्धा दुचाकीचे पार्ट वेगळे करायला तयार नव्हता. तेव्हा सर्पमित्राणीच चैन कव्हर काढून कोब्रा नागाला तब्बल दोन तासानंतर रेस्क्यू करण्यात यश आले आहे.

Viral News
Viral News : एकमेकींचे केस धरले, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; २ महिला वकिलांचा भररस्त्यात राडा; पाहा VIDEO

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com