Viral Video: 'स्वप्न हे स्वप्नच राहिलं...' ९० च्या दशकातली ही वस्तू पाहून तुम्हालाही आठवेल बालपण

९० च्या दशकातली पिगी बँक पुन्हा चर्चेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांच्या बालपणीच्या आठवणींना नवा उजाळा मिळाला आहे.
Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

आजही लहान होतं ते आयुष्य बरं होतं असं तुम्ही अनेकांच्या तोंडातून ऐकलचं असेल. याशिवाय त्यात ९० च्या दशकातला जन्म म्हणजे जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो. यावेळी जन्मलेल्यांनी अनेक नवनवीन बदल पाहिले आहेत. त्या काळातील गाणी, वस्तू, ठिकाणे ही कशी बदलत गेली हे ९० च्या दशकात जन्मलेल्यांनी जवळून पाहिलं आहे. यावरून 'गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी' असं सध्या म्हणता येईल. सोशल मीडियावर देखील ९० च्या दशकातील जुन्या वस्तूंचे विविध व्हिडीओ व्हायरल होतात. हे फोटो पाहिल्यानंतर पुन्हा त्याच काळात आपण गेलो असं वाटतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Viral Video
Couple Romance Viral video : आता याला काय म्हणावं? गर्लफ्रेंडने डोके मांडीवर ठेवले अन्...; उडत्या विमानात कपलचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला घर असलेला पिगी बँक दिसत आहे. हा पिगीबँक घेणं हे तेव्हा प्रत्येक लहानमुलाचं जणू स्वप्नच होतं. ज्याच्याकडे असा पिगी बँक असेल तो श्रीमंत असं समजलं जायचं. गंमत वाटेल असा हा पिगी बँक आहे. कोणी जरा हा पिगी बँक घेतला तर तो पाहण्यासाठी मोठी गर्दी जमायची. केवळ पैसे साठवण्यासाठी नाही तर, घराच्या आकाराचा आकर्षण हा पिगी बँक आहे. या पिगी बँकमध्ये घरामध्ये एक कुत्रा असतो. दरवाजाच्या समोर तुम्ही पैसे ठेवल्यानंतर हा दरवाजातून तो कुत्रा बाहेर येतो आणि पैसे घेऊन जातो असा गंमीतीशीर खेळ असणारा हा पिगीबँक आहे.

@kajal.pareek या इन्स्टाग्राम अकांउटवरून हा व्हिडीओ शेअर कऱण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ९० च्या प्रत्येकाचं स्वप्न असा पिगी बँक असं म्हटलं आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्संनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहलं आहे 'एक स्वप्न जे कधी पूर्णच झालं नाही...' तर आणखी एकाने आता मी २४ वर्षाचा झालो तरी घेऊ शकलो नाही असं म्हटलं आहे.

Viral Video
Pune Koyta Gang : आम्हीच भाई, आमच्या नादाला... पुण्यात हातात कोयते घेऊन तरुणांचा धुडगुस, घटनेचा Video Viral

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com