Viral Video : घाटातील रस्त्यावर फिरतंय भूत? ड्रायव्हरच्या कॅमेऱ्यात भूत कैद? काय आहे सत्य?

Fact Check : तुम्ही रात्री प्रवास करत असाल तर तुम्हाला भूत दिसू शकतं. हे आम्ही म्हणत नाहीये. असा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. मात्र, खरंच रात्री रस्त्यावर भूत फिरतंय का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
fact check
fact checksaam tv
Published On

व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये कारमधील व्यक्तीने बनवल्याचं दिसतंय. त्यात रात्रीच्या अंधारात भूतसदृश एक लाल साडी घातलेली महिला दिसतेय. हा यवतमाळचा करळगाव घाट असल्याचा दावा करण्यात आलाय. या घाटात अनेकदा अपघातात घडतात. अनेकांचे याच घाटात जीव गेले, त्यामुळे अशा अपघातातील एखाद्या मृत व्यक्तीचाच हा भटकता आत्मा असावा, अशी चर्चा सुरूये. हा विषय गंभीर आहे. त्यामुळे याची शहानिशा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी संजय राठोड थेट करळगाव घाटात पोहोचले.

व्हिडिओत भूत दिसल्याचा दावा करण्यात आलाय त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी पोहोचले मात्र, दिवसा असं काही दिसलं नाही. गावातील काही व्यक्तींची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी खरंच गावातील लोकांनी घाटात भूत पाहिलंय का? हे जाणून घेतलं.

fact check
Mumbai Crime : धडकन बारमध्ये काळजाचा ठोका चुकवणारा थरार! किरकोळ वाद टोकाला गेला, मॅनेजर बेसावध असताना झाला खुनी खेळ

आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

- व्हिडिओत दिसणारी महिला भूत नाही.

- व्हायरल व्हिडिओत दिसणारी महिला मनोरुग्ण.

- मनोरुग्ण महिलेचा व्हिडिओ व्हायरल करून भूत असल्याचा दावा.

- लोकांना घाबरवण्यासाठी खोडसाळपणा केलाय.

fact check
Navi Mumbai News : सहलीसाठी गेला असताना उलटी आणि बेशुद्ध, इमॅजिकामध्ये झालेल्या आयुषच्या मृत्यूचं खरं कारण समोर

त्यामुळे यवतमाळच्या करळगाव घाटात रात्री भूत फिरत असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. भूत वैगरे काही नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवणं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा ठरतो. त्यामुळे असा खोडसाळपणा करू नका.

fact check
Dattatray Gade : दत्तात्रय गाडेचं शेवटचं लोकेशन कुठलं? नवी माहिती समोर, दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी आऊट ऑफ रीच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com