Sangli: मिरजेत वाहन चोरीचा अजब प्रकार, चोरटयांनी गाडीचे पार्ट काढलं अन सांगाडा लावला रस्त्यावर, घटना CCTV मध्ये कैद

Sangli Theft Video: महाराष्ट्रातील सांगलीमधून एक विचित्र अशा घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका चोरीच्या घटनेचा आहे. पण नेमक काय घडले ते तुम्ही एकदा पाहा.
Sangli Theft Video
SangliSaam Tv
Published On

Vehicle Theft Vidoe: मिरजेत वाहन चोरीचा अजब प्रकार समोर आला आहे. दोन दिवसापूर्वी चोरीला गेलेले मोपेड वाहन चोरट्याने त्याचे पार्ट काढून सांगाडा रात्री रस्त्यावर लावून चोरटा पसार झाला आहे. हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

मिरजेच्या वखार भाग माळी स्मशानभूमी जवळ प्रमिला यादव यांची मोपेड वाहन दोन दिवसांपूर्वी चोरीला गेले होते. या चोरीची(Theft) तक्रार मिरज शहर पोलिसात तक्रार देऊन वाहनाचा शोध सुरू होता. मात्र, आज सकाळी हे वाहन वेताळ नगर येथे रस्त्यावर लावून चोरटा पसार झाला आहे.

या वाहनाचे पार्ट काढून घेऊन वाहनाचा सांगाडा रस्त्यावर लावण्यात आला होता. या चोरीचा अजब प्रकारामुळे परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वाहन चोरून नेत असताना चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. पहाटे वाहन घेऊन चोरटा चालत जात असताना दिसून आला. पोलिसांनी वाहनाचा सांगाडा जप्त केला असून मिरज शहर पोलीस चोरट्याचा शोध घेत आहे.

घडलेल्या या प्रकारात चोरट्याने नेमके असे का केले आणि कशासाठी केले ते अद्याप कळालेले नाही. हा व्हिडिओ(Video) सध्या इन्स्टाग्रामवरील saamtvnews या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. ऐवढेच नाही तर सर्व प्रकार पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक संतापजनक आणि मजेशीर प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Sangli Theft Video
Sambhajinagar Video: संभाजीनगरमध्ये मोठा दरोडा! ८ किलो सोने, ४० किलो चांदी घेऊन चोरटे पसार; घटना सीसीटीव्हीत कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com