Viral Video : गळ्यात घंटी अन् मोकळे केस, बेपत्ता महिला गुहेत सरपटताना आढळली; अवतार पाहून संपूर्ण गावात दहशत

Viral Video : सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात आज एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्ही नक्कीच डोक्याला हात लावाल.
Shocking Viral Video
Viral Video Saam Tv
Published On

सोशल मीडिया म्हटलं की व्हिडिओचा खजिनाच आहे. याच सोशल मीडियावर कायम अनेक अंतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी अंगाचा थरकाप उडवणारे व्हिडिओ असतात तर कधी अक्षरशः भावनिक व्हिडिओ व्हायरल होत असतात.सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,जो व्हिडिओ पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसेल!.

Shocking Viral Video
Train Viral Video : बायकांनी कहरच केला! धावत्या ट्रेनमध्ये उघडलं पार्लर; दरवाजात उभे राहून आयब्रो करतानाचा VIDEO व्हायरल

जगाच्या कानाकोपऱ्यात दर सेंकदाला अनेक घडना घडत असतात तर काही घटना उघडकीस येत असतात. या समोर आलेल्या काही घटनांवर व्यक्तीचा विश्वास बसणे बऱ्याचदा अशक्य होते तर काही घटना या नागरिकांच्या नजरेत येण्यासाठी रंगवून दाखविल्या जातात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर तुम्हालाही असे अनेक प्रश्न पडतील. चला तर पाहूयात नक्की कोणता व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओत सध्या असे समजते की, एका गुहेत नागासारखी वागणारी तरुणी सापडली आहे. जी मुळात साधारण ३ महिन्यांपासून बेपत्ता (disappeared)होती. ही तरुणी गुहेत सापडल्यानंतर अर्थात तरुणीचे नागाचं रुप बघून अक्षरश:लोकांनी तिची पूजा केली.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ झारखंडमधील रानीडीहमधला असल्याचे समजते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक लहानशी गुहा दिसून येत आहे. याच गुहेत तुम्ही नीट पाहिले तर एक तरुणी आहे. तिच्याकडे नीट पाहिले तर ती सापासारखी जीभ बाहेर काढत आहे. गुहेतील तरुणीचा हा प्रकार कोणीतरी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. मात्र तिच्याकडे पाहिले तर थोडेसे घाबरायला होत आहे.

Shocking Viral Video
Viral Video : लॉटरीच लागली! मच्छिमारांना पुराच्या पाण्यात सापडले ३० किलो वजनाचे दोन मोठे मासे, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com