Viral Video: सनेडो सनेडो...मगरीचा धोका, तरीही गुजरातींचा जोशच न्यारा; डीजेच्या तालावर गुडघाभर पाण्यात गरब्याचा आनंद, VIDEO व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यात सध्या एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,जो सध्या प्रचंड व्हायरल झालेला आहे.
Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

सप्टेंबर महिना सुरु झाला असला तरी देशातील काही भागात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. पडणाऱ्या पावसाने काही भागात भीषण पुरजन्य परिस्थिती निर्माण केलेली आहे. या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे.अशातच सोशल मीडियावर या संबंधिक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,जो व्हिडिओ पाहून तुम्ही व्हिडिओत दिसणाऱ्या नागरिकांचे कौतुक कराल.

Viral Video
Crocodiles Viral Video : चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास; नजारा पाहून लोकांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO

पूरजन्य परिस्थितीमधील अनेक व्हिडिओ(Video) आपण पाहिले आहे.पूर ज्या भागात येतो,त्या भागातील अनेक व्यक्ती संपूर्ण निराश झालेले दिसून येतात तर काहींना रडन आवरत नाही.मात्र सध्या गुजरातमधील व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय,ज्यात गुजरातमध्ये आलेल्या पुरात सुद्धा नागरिंकानी धीर काही सोडलेला नाही.पाहा तरी नेमके काय आहे व्हिडिओत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ गुजरात येथील वडोदरा जिल्ह्यातील आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून तेथे मुसळधार पावसाची ये-जा सुरु असल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.मात्र व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की,एका परिसरात गुडघ्या एवढे पाणी संपूर्ण परिसरात भरले आहे. यात अनेक महिला,तरुणी आणि पुरुष दिसून येत आहेत.मात्र व्हिडिओ नीट पाहिला तर दिसून येतो की, काही वेळात पुराच्या साचलेल्या पाण्यात ते सर्व गरबा खेळण्यास सुरुवात करतात.सध्या या व्हिडिओने गुजरातच नाही तर अख्या देशाचे लक्ष वेधले आहे.

व्हायरल (Viral)होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @narendrasinh_97 या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ साधारण २ दिवसांपूर्वी व्हायरल झालेला असून आतापर्यंत व्हिडिओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज आलेले आहेत तर लाईक्सही मिळत आहेत.

प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट होताच अनेक शहरातील नेटकऱ्यांच्या पसंती पडलेला आहे. व्हिडिओ पाहताच अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत,त्यातील एका यूजरने कमेंट्सबॉक्समध्ये लिहिले आहे की,'पाहावे ते दररोज नवलच आहे',तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की,'भारीच''अशा अनेक गमतीदार तर काहींनी कौतुकास्पद प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

Viral Video
Viral Video: गोरेगाव स्टेशनवर थरार! लोकल ट्रेन पकडताना तोल गेला, प्रवासी धाडकन प्लॅटफॉर्मवर कोसळला; पुढे काय घडलं? पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com