Bread Making Viral Video
Bread Making Viral VideoSaam Tv

Viral Video: धक्कादायक! नाश्त्याला ब्रेड खाताय? मग ब्रेड बनवण्याचा 'हा' व्हिडिओ एकदा पाहाच, पाहून म्हणाल...

Bread Making Viral Video: सकाळी सकाळी नाशत्याला काय बनवावं असा प्रश्न अनेक गृहीणींना पडलेला असतो. त्यामुळे अनेकदा ब्रेड बटर किंवा चहा आणि ब्रेड असा नाश्ता केला जातो. परंतु ब्रेड नेमका कसा तयार केला जातो हे तुम्ही कधी पाहिलय का? याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published on

Bread Making Viral Video:

सकाळी नाश्त्याला काय बनवावा हा प्रश्न अनेक गृहीणींना पडलेला असतो. सकाळी सकाळी मुलांचा डबा, ऑफिसची घाई या सर्व गडबडीत अनेकांना नाश्ता बनवायला वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेकदा नाश्त्यात ब्रेड बटर किंवा चहा ब्रेड असा साधा नाश्ता केला जातो. परंतु हे ब्रेड कसे बनवले जातात हे तुम्हाला माहितीये का? ब्रेड बनवायच्या प्रोसेसचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral News In Marathi)

व्हायरल व्हिडिओत एका फॅक्टरीमध्ये कामगार ब्रेड बनवताना दिसत आहे. सर्वप्रथम एका मशीनमध्ये ब्रेडसाठी मैदा आणि इतर पदार्थ मळून घेताना दिसत आहेत. या पीठात तेल घातले जाते. त्यानंतर त्या पीठाचे मोठे मोठे गोळे पात्रात ठेवताना दिसत आहेत. त्यानंतर बेक होण्यासाठी पीठ एका मशीनमध्ये ठेवले जाते. त्यानंतर हे पीठ बेक होऊन त्याचे ब्रेड बनलेले असतात. त्यानंतर त्याचे ब्रेड तयार करण्यासाठी त्याला मशीनमध्ये टाकले जाते. त्यात ब्रेड योग्य आकारात कापले जातात. त्यानंतर हे सर्व ब्रेड प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक केले जातात. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ब्रेड बनवण्याची जागा खूप अस्वच्छ असल्याचे दिसत आहे.

Bread Making Viral Video
GYM Viral Video: भारतीय नारी सर्वात भारी! तरुणीचा साडी नेसून जिममध्ये वर्क आऊट ;VIDEO व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील एका ब्रेड बनवणाऱ्या कारखान्यातील आहे. या व्हिडिओत ब्रेड बनवणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याने हातात हातमोजे घातलेले दिसत नाहीये. तसेच तोंडाला मास्क बांधलेला नाही. तसेच ज्या जागेवर ब्रेड बनवले जातात ती जागा खूप अस्वच्छ आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर खूप कमेंट्स केल्या आहेत. खूप अस्वच्छ, अस्वच्छ पद्धतीने बनवलेले ब्रेड आपण खातो, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

Bread Making Viral Video
Viral Video: ओव्हर कॉन्फिडन्स नडला! धावत्या ट्रेनमधून उतरायला गेली तरुणी, पण...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com