Viral Video: रुसलेल्या बायकोची समजूत काढण्यासाठी नवरा थेट चढला ट्रान्सफॉर्मरवर; गंमतीशीर VIDEO व्हायरल

Jhansi Viral Video: एका व्यक्तीची पत्नी नाराज होऊन तिच्या माहेरी गेल्याने आपल्या पत्नीला परत बोलवण्यासाठी पती थेट ट्रान्सफॉर्मरवर चढला आहे.
Viral Video
Viral VideoSaam Digital
Published On

Husband Wife Viral Video

आजवर आपण अनेक प्रेमी युगुलांचे व्हायरल झालेले व्हिडिओ पाहिले आहेत. आपल्या प्रेमासाठी टोकाची पाऊलं देखील उचलण्यास देखील तयार होतात.फक्त लग्ना आधीच याचं असं प्रेम आपल्याला दिसून येत नाही तर लग्नानंतरही आपल्या प्रेमासाठी नवरा- बायको वाटेल ते करण्यासाठी तयार असतात. त्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात एका व्यक्तीची पत्नी नाराज होऊन तिच्या माहेरी गेल्याने आपल्या पत्नीला परत बोलवण्यासाठी पती थेट ट्रान्सफॉर्मरवर चढला आहे.(Viral Video) ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Viral Video
Viral Video : विमानाच्या पंखाला हवेतच तडा, 31000 फूट उंचीवर प्रवाशांचा जीव टांगणीला, पाहा VIDEO

सोशल मीडियावर आजपर्यंत अनेक जोडप्यांच्या भांडणाचे तर कधी हाणामारीचे गंमतीशीर व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.त्यात या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या एका कडेला आपल्याला भला मोठा ट्रांसफ़ॉर्मर दिसून येत आहे. या ट्रांसफ़ॉर्मरवर असंख्य अशा विद्युत वायरी आहेत त्यातच तो पठ्या आपल्याला ट्रान्सफॉर्मरवर उभा दिसत आहे. त्याला जमिनीवर उतरवण्यासाठी दोन व्यक्ती ट्रान्सफॉर्मरवर चढलेले दिसत आहेत तसेच घटनास्थळी पोलीस आणि परिसरातील काही लोक तिथे आलेले दिसत आहेत. त्याला ट्रान्सफॉर्मरवर असलेले व्यक्ती खाली उतरवण्यासाठी समजावून सांगत आहेत तरी तो काही ऐकताना दिसत नाही.

व्हायरल होत असलेला व्हायरल व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील झांसीचा असल्याचे समजत असून नाराज झालेल्या बायकोला घरी परत बोलवण्यासाठी पती थेट ट्रान्सफॉर्मरवर चढलेला आहे.

झांसीचा( Jhansi )व्हिडिओ सोशल मीडिया एक्सवरील @priyarajputlive या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर होताच व्हिडिओवर अनेक गंमतीशीर प्रतिक्रिया येत असून मोठ्या प्रमाणात व्हिडिओला लाईक्स अन् व्ह्यूज मिळाले आहे.

Viral Video
VIDEO VIRAL : धावत्या बाईकवर तरुणाने केला डान्स; तोल गेला अन् तोंडावर जोरदार आपटला...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com