Viral Video: धावत्या कारच्या छतावर कपलचा खुल्लमखुल्ला रोमान्स; VIDEO तुफान व्हायरल, नेटकरी संतापले...

Hyderabad Couple Video : सध्या सोशल मीडियावर एका प्रेमीयुगुलाचा भररस्त्यात रोमान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Hyderabad Couple Kissing Viral Video
Hyderabad Couple Kissing Viral VideoTwitter
Published On: 

Hyderabad Couple Kissing Viral Video

सध्या सोशल मीडियावर एका प्रेमीयुगुलाचा भररस्त्यात रोमान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आपण कुठे आहोत, काय करतोय याचं जराही भान या दोघांना नाहीये. हा व्हायरल व्हिडीओ हैदराबादमधील पीव्ही नरसिंह राव एक्स्प्रेस वेवरील असून त्यांच्या या व्हिडीओवर प्रवाशांसह नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. (Latest Marathi News)

Hyderabad Couple Kissing Viral Video
Blue Dosa Video: खाते रहो! सोशल मीडियावर Viral झालाय निळा डोसा; VIDEO पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल...

व्हायरल व्हिडीओमध्ये हे कपल चालत्या कारच्या छतावर किस करताना दिसत आहेत. ज्या हायवेवर त्यांनी हे कृत्य केले, तो प्रचंड वर्दळीचा रस्ता दिसून येत आहे. या प्रेमीयुगुलानं अशा पद्धतीने भररस्त्यात असं कृत्य केल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात टीका केली जातेय. त्यांचा हा व्हिडीओ पाहून त्याला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे. (Social Media)

हायवेवरील रोमान्स करतानाचा हा प्रकार मागच्या कारमध्ये असलेल्या काही प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. हा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच ट्विटरवर शेअर करताच तुफान व्हायरल झाला आहे. ‘धाराणी’ या युजरने हैदराबाद पोलिसांना टॅग करत हा व्हिडीओ शेअर केला आहे. अशाप्रकारच्या प्रेमीयुगुलांच्या कृत्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या इतर कारचालकांचे त्याकडे लक्ष जाते. परिणामी असं केल्यामुळे अपघात देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई करावी अशी मागणी सध्या केली जात आहे.

Hyderabad Couple Kissing Viral Video
Virat Kohli Viral Video: 'I Love You विराट..',लाईव्ह कार्यक्रमात अरिजितने हाक मारताच विराटची भन्नाट रिॲक्शन व्हायरल,Video

या आधी देखील सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. मेट्रो ट्रेन, लोकल ट्रेन तसेच अन्य ठिकाणी प्रेमीयुगुलांचे रोमान्स करतानाचे असे अनेक व्हिडीओ आजवर व्हायरल झाले आहेत. अशा प्रेमीयुगुलांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून पोलिसांकडे केली जात आहे.

Hyderabad Couple Kissing Viral Video
Petha Making Video: पेठा बनवताना तरुणाने त्यातच तोंड, हात, पाय धुतले; संतापजनक VIDEO पाहून मिठाई खाणं सोडून द्याल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com