
Cow Dohale jewan: शेतकऱ्यांच्या जीवनात कुठलाही पाळलेला प्राणी हा अत्यंत प्रेमाचा आणि महत्त्वाचा भाग असतो. मग तो गाय असो की बैल त्यामुळे शेतकरी आपल्या पाळलेल्या बैलाला असू देत किंवा गाईला मोठ्या प्रमाणात जीवापाड प्रेम करत असतो. याचा प्रत्यय आलाय बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव माळी या गावात आलाय. या गावातील पांडुरंग मगर आणि वसंता मगर यांनी आपल्याकडे असलेल्या गाईचं चक्क डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केलेला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
समाजात डोहाळे जेवण आणि त्याचे सोपस्कार पार पाडले जातात ते सोपस्कार मगर परिवाराने आपल्या गाईवर केले आणि संपूर्ण गावाला डोहाळे जेवण(Baby Shower) देण्यासाठी आमंत्रित केलं. परिवारातील शिवाय गावातील महिलांनी गाईला हार तुरे घालून पारंपारिक(Traditional) गाणी सुद्धा म्हटली, त्यामुळे आजही ग्रामीण भागात शेतकरी प्राण्यांवर आपल्या परिवारातील सदस्य इतकेच प्रेम करत असल्याचा संदेश मगर कुटुंबीयांनी दिला आहे.
सोशल मीडियावर यापूर्वीही प्राण्यांचे डोहाळ जेवणाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहे. ज्या व्हायरल व्हिडिओला नेटकऱ्यांनी मोठी पसंती दिलेली दिसून आले आहे. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओलाही प्रत्येक नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. शिवाय अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे.
देऊळगाव माळी या गावातील व्हिडिओ ''इन्स्टाग्राम'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''saamtv'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''बुलढाण्यात शेतकऱ्याने केलं आपल्या गाईचं डोहाळे जेवण'' असे लिहिण्यात आलेले आहे. शिवाय नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील काही यूजर्संनी लिहिले आहे की,''हे फक्त शेतकरीच करू शकतो सिटीत राहणाऱ्याला काय कळणार मुक्या जनावराचा जिव्हाळा'' तर काहींनी शेतकऱ्याचे कौतुक केलेले आहे.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.