Birudev Dhone: गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर आणि बिरुदेव डोणे यांचे गावात स्वागत; पाहा व्हिडिओ

UPSC Toppers Birudev Dhone: महाराष्ट्रात सध्या कोल्हापुरातील एका तरुणाची जोरदार चर्चा होत आहे. तो म्हणजे यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेला बिरुदेव डोणे. सध्या याच्या स्वागतचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
UPSC Toppers Birudev Dhone
Birudev DhoneSaam Tv
Published On

kolhapur News: यूपीएससी परीक्षेत प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील बिरुदेव डोणे याची जंगी मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांचा गजर करत बिरूदेव डोणेचं स्वागत मुरगूड आणि यमगे गावात करण्यात आले. त्यांच्या स्वागताचा जल्लोष सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

प्रतिकूलतेवर मात करत मिळवलं यश

कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे गावातील बिरुदेव डोणे(birudev-dhone) याने यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. धनगर समाजातील आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांने यूपीएससी परीक्षेत यश मिळवल्याने त्याच्यावर गेली आठवडाभर अभिनंदनचा वर्षाव सुरू आहे.

पारंपरिक पद्धतीने स्वागत

बिरदेव डोणे याचं मुरगुड इथं गावकऱ्यांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. पारंपरिक वाद्यांचा गजर करत त्याची मिरवणूक त्याच्या मूळ गावी यमगे इथपर्यंत करण्यात आली. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बिरुदेव डोणे याच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला.

सर्व व्हिडिओ (Video) सध्या इन्स्टाग्राम, फेसबूक आणि ट्वीटर या माध्यमांवर तुफान व्हायरल होत असून हा व्हिडिओ saamtvnews या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाहण्यासाठी मिळत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज मिळत असून प्रत्येक लोकांनी या तरुणाचे कौतुकच केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

UPSC Toppers Birudev Dhone
Viral Video: रस्त्यावर थेट महिलेची तरुणाला मारहाण, जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी धोपटले; व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com