रस्त्यावर कोणतेही वाहन चालवताना विशेष काळजी घ्यायची असते. वाहन चालवण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे खूप गरजेचे आहे. तुम्हाला वाहन चालवता यायला हवे नाहीतर मोठा अनर्थ होऊ शकतो. कधी कधी अपघात होण्याची शक्यता असते. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आपल्याला ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागते. त्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यासमोर वाहन चालवून दाखवावे लागते. परंतु तुम्ही ड्रायव्हिंग टेस्टसाठी गेलात अन् तुमची स्कूटी कुठेतरी भलतीकडे झुडुपात नेऊन आदळली तर. असाच एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडिओत एक तरुणी आपली स्कूटी चालवताना दिसत आहे. ती ड्रायव्हिंग लायसन्सच्या टेस्टसाठी आल्याचे सांगण्यात आले आहे. ही मुलगी स्कूटी चालवते. परंतु स्कूटी चालवताना तिचा अचानक तोल जातो आणि ती पुढे जाऊन झुडपात पडते. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढणारे अधिकारी येतात आणि तरुणीला मदत करतात.तिची स्कूटी उचलतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
PalsSkit या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरले नाही. एवढ्या आत्मविश्वाने स्कूटी चालवायला गेली परंतु भलतच काहीतरी घडलं, असं नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. या व्हिडिओ नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहे. 'ड्रायव्हिंग टेस्ट द्यायला गेली अन् तोंडावर पडली','तरुणीला जर स्कूटी चालवता येत नव्हती तर मग कशाला ड्रायव्हिंग टेस्ट', अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.