Viral Video: रिक्षा आहे की मिनी बस; दोन-चार नव्हे तर तब्बल १९ प्रवासी भरले; पोलिसांनी पकडलं, पुढं काय घडलं? पाहा VIDEO

19 Passengers in a Auto Rikshaw Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका रिक्षात तब्बल १९ प्रवासी प्रवास करताना दिसत आहेत.
Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ हे मनोरंजानाच्या दृष्टीने बनवलेले असतात तर काही गोष्टी या मुद्दाम केलेल्या असतात. अनेकांना यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो. सध्या सोशल मिडियावर एका रिक्षाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या रिक्षात एक, दोन, तीन नव्हे तर तब्बल १९ प्रवासी बसल्याचे दिसत आहे. एकदम चेंगराचेंगरी करुन ते रिक्षात बसल्याचे दिसत आहे. रिक्षात अशा पद्धतीने बसणे हा गुन्हा आहे त्याचसोबत यामुळे प्रवाशांच्याही जीवाला खूप धोका निर्माण होऊ शकतो.

Viral Video
Viral Video: भारीच! युवकांना मागे टाकत लुंगी घालून काकांचा जबरदस्त डान्स; स्टेजवर डान्सचा धुरळा, पाहा VIDEO

ही घटना झाशीतील आहे.झाशीतील एक रिक्षाचालकाने आपल्या रिक्षात तब्बल १८ प्रवाशांना बसवले होते. आणि रिक्षाचालक पकडून एकूण १९ प्रवासी होते. ही घटना कॅमेरात कैद करण्यात आली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत रिक्षातील एकेक प्रवासी खाली उतरताना दिसत आहेत. एकूण १९ प्रवासी या रिक्षातून उतरताना दिसत आहे. साधारणपणे, एका रिक्षात फक्त ३ प्रवाशांना बसणे आवश्यक आहे. त्यापेक्षा जास्त प्रवासी बसले तर दंड भरावा लागतो. मात्र, झाशीतील या रिक्षाचालकाने चांगलीच कमाल केली आहे. ही घटना १५ फेब्रुवारी रोजी घडली आहे.

Viral Video
Viral Video: 'छावा'ची पडद्यावर डरकाळी, चित्रपटगृहात मानाचा मुजरा, ताईची शिवगर्जना ऐकून अंगावर शहारे येतील

या रिक्षाचालकाला एका पोलिस ठाण्याच्या हद्दीत तपासणी नाक्यावर थांबवण्यात आले आहे. या रिक्षाचालकावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. या व्हिडिओबाबत झाशी पोलिसांनी माहिती दिली आहे. १५ फेब्रुवारी रोजी एका रिक्षातून तब्बल १९ प्रवासी जात असताना पकडले आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

Viral Video
Viral Video: छोटा हत्ती झाला भजनात तल्लीन, ठेका घरत केला डान्स; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com