Viral Video: देवाला फुले वाहण्यासाठी तमिळनाडूतील अनोखी परंपरा, अरुणाचलेश्वर मंदिरातील Viral Video ची भाविकांना पडली भूरळ

Arunachaleswarar Temple Viral Video: सध्या देशभर दिवाळी सणाचा माहोल सुरु आहे. भारत एक असा देश आहे जिथं अनेक प्रकारचे सण-सभांरभ सतत सुरु असतात
Arunachaleswarar  Temple Viral Video
Arunachaleswarar Temple Viral VideoSaam digital
Published On

Arunachaleswarar Temple Viral Video

सध्या देशभर दिवाळी सणाचा माहोल सुरु आहे. भारत एक असा देश आहे जिथं अनेक प्रकारचे सण-सभांरभ सतत सुरु असतात. प्रत्येक प्रदेशातील सण हे तेथील देव-देवतांच्या प्रथेनूसार साजरे केले जातात. अशातच तमिळनाडूमधील एका आगळ्यावेगळ्या परंपरेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मंदिरातील देवताला एका मुलीच्या अवतारातील पुतळा तयार करुन उंचावरून फुला्ंची उधळन केली जात आहे. या व्हिडीओत नक्की काय वेगळेपण आहे ते बघूयात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, मंदिराच्या आवारात देवाची पालखी आहे. या पालखीत असलेल्या देवांच्या मुर्तीवर फुलांची उधळल केली जात आहे. मात्र या उधळलनाची पद्धत अनोखी आहे. पालखीच्यासमोर जरा ऊंचीवर एक लाल रंगाच्या साडीमध्ये एक मुलीच्या रुपातील पुतळा तयार केला आहे.

पुतळ्याला झोपाळ्या सारख बाधूंन उंचावर लटकत ठेवले आहे. झोपाळ्याला जसे पुढेमागे जोरात घेचले जाते, त्याचप्रमाणे या मुलीच्या पुतळ्यास पुढेमागे जोरात घेचले जात आहे. याद्वारे पालखीतल्या देवांच्या मुर्तीवर फुलांची उधळन केली जातेय. सुरुवातीस आपल्याला पुतळ्याच्या जागी खरोखरचं जिवतं मुलगी असल्याचे वाटते. या कार्यक्रमाच्यावेळी तिथे भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून येत आहे. अनेकजण हा प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये टिपताना दिसून येत आहेत.

सदर व्हिडीओ @tiruvannamalaikingdom या इन्स्टांग्राम पेजवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओला लाखोंच्या घरात व्हूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ अरुणाचलेश्वर मंदिरातील एका कार्यक्रमातील आहे. तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये हा क्षण कैद केला आहे.

व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने म्हटलंय की 'मी पहिल्यांदा अस काही बघितलं.,अनेक नेटकरी या व्हिडीओला बघून आश्चर्यचकित झाले आहेत. तसंच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअरही केला जातोय.

Arunachaleswarar  Temple Viral Video
Viral Video: किती ते प्रेम! बहिण आणि कर्तव्य दोन्हींचं ओझं पेलणारा भाऊ; कौतुकास्पद VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com