बेवफा! नवरा बेडरूममध्ये गेला, बेडमध्ये नको त्या अवस्थेत लपला होता बायकोचा बॉयफ्रेंड, Video व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये एकजण त्याच्या बेडरूममध्ये बेडच्या आत लपलेल्या बायकोच्या बॉयफ्रेंडला पकडतो असे दिसते.
viral video
viral videox
Published On

Viral : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एका व्हायरल व्हिडीओची नेटकऱ्यांमध्ये चर्चा पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये एकजण त्याच्या घराच्या बेडमध्ये लपलेल्या बायकोच्या बॉयफ्रेंडला पकडतो. बेड उचलून धरल्यानंतर नवऱ्यासमोर बायकोचे बिंग फुटते. हा व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याबाबतची माहिती सध्या उपलब्ध नाहीये.

आजकाल विवाहबाह्य संबंधांच्या अनेक घटना सर्रास पाहायला मिळतात. कधी नवरा फसवणूक करतो, तर कधी बायको... तर कधी दोघेही एकमेकांना फसवत असतात. अशा अनेकांच्या अफेयरच्या गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवऱ्याची फसवणूक करणाऱ्या बायकोचा आणि तिच्या बॉयफ्रेंडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एकजण त्याच्या घरातल्या बेडरूममध्ये प्रवेश करतो. बेडशीट काढत बेड उघडताना दिसतो. त्याच्या बायकोचा बॉयफ्रेंड बेडच्या आतमध्ये लपल्याचे पाहायला मिळते. नवऱ्यासोबत काहीलोक दिसतात, त्यांच्या हातात काठ्या असल्याचे दिसते. बायकोच्या बॉयफ्रेंडला रंगेहात पकडल्यानंतर पुढे काय घडते ते व्हिडीओमध्ये दाखवले नसले, तरीही पुढे काय घडले असेल, याचा कोणाही सहज अंदाज लावू शकतो.

viral video
Fact Check : कोल्डड्रिंकमध्ये व्हायरस? काय आहे व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होणाऱ्या मेसेजमागचं सत्य?

हा व्हायरल व्हिडीओ @sankii_memer नावाच्या अकाउंटने इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ७ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. काहींनी बॉयफ्रेंडसह बायकोलाही फटके पडले असतील अशी शक्यता वर्तवली आहे.

viral video
Palghar : मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे आमिष, शिंदेंच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल; अटक होणार का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com