Girls Fighting Viral Video: प्रेमासाठी 'दे दणादण'! कॉलेजच्या आवारात दोघी भिडल्या... लाथा बुक्क्यांची तुफान बरसात; व्हिडिओ व्हायरल

Engineering college Girls Fighting: केस ओढत लाथा घालत इंजिनिअरिंग कॉलेजच्या आवारात सर्वांसमोरच या तरुणींचा तुफान राडा पाहायला मिळत आहे.
Engineering college Girls Fighting Viral Video
Engineering college Girls Fighting Viral VideoSaamtv

Girls Fighting in College Viral Video: सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. जगाच्या कोपऱ्यात झालेली कोणतीही घटना एका क्षणात सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचते. अनेकदा हे व्हायरल व्हिडिओ असे काही भयानक असतात की पाहणाराही चक्रावून जातो.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका बॉयफ्रेंडसाठी दोन मुली भांडताना दिसत आहेत. या तरुणींचा हा वाद इतका टोकाला जातो की दोघींमध्येही मारामारी सुरू होते. या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Viral Video News In Marathi)

Engineering college Girls Fighting Viral Video
Girls Fight Viral Video: एका पोरावर दोघींचा जीव जडला अन् राडा झाला! पोरींची भररस्त्यात तुफान हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

काय आहे प्रकरण?

सध्या सोशल मीडियावर (Social Media) भांडणाचे (Fighting Video) अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाच एका नवीन व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन मुली सर्वांसमोरच मारामारी करताना दिसत आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजच्या आवारात सर्वांसमोरच हा तुफान राडा पाहायला मिळत आहे.

बॉयफ्रेंडसाठी पोरींमध्ये जुंपली....

एकाच मुलावर दोघींचा जीव जडल्याने हा सगळा राडा झाला. धक्कादायक बाब म्हणजे कधी खाली पाडून लाथ घालत, तर कधी केस ओढत या तरुणी एकमेंकींवर तुटून पडल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. एकमेकींना शिव्या देत दोन्ही मुली मारामारी करत आहेत, तर कॉलेजच्या आवारातील इतर मुले- मुली या भांडणाचा व्हि़डिओ करत मजा घेताना दिसत आहेत.

Engineering college Girls Fighting Viral Video
Prakash Ambedkar News: प्रकाश आंबेडकरांची 'इंडिया' आघाडीत जायची इच्छा; अडलंय कुठं?, स्वतःच सांगितली कारणं

व्हिडिओ तुफान व्हायरल....

समोर आलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ उत्तरप्रदेशमधील (Uttar Pradesh) कॉलेजचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी भांडणे सोडवायला पाहिजे होती असे म्हणले आहे, तर काही जणांनी प्रेमासाठी काहीपण म्हणत या मुलींचे समर्थनही दिले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com