Prakash Ambedkar News: प्रकाश आंबेडकरांची 'इंडिया' आघाडीत जायची इच्छा; अडलंय कुठं?, स्वतःच सांगितली कारणं

Prakash Ambedkar On INDIA Alliance: इंडियामधील (INDIA) सहभागाबद्दल प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी महत्वाचे विधान केले आहे.
Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar NewsSaamtv
Published On

सचिन बनसोडे, प्रतिनिधी....

INDIA Meeting Mumbai: आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणूकांच्या दृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक मुंबईमध्ये पार पडत आहे. या आघाडीत देशभरातील २८ पक्ष एकत्र आले आहेत.

राज्यात शिवसेना ठाकरे गटासोबत युती असलेली वंचित बहुजन आघाडी या गटात सहभागी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याबाबत स्वतः वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खुलासा केला आहे.

Prakash Ambedkar News
Jalgaon Rain: जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती; पावसाअभावी खरीप हंगाम वाया जाण्याची भीती

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

वंचित बहुजन आघाडीच्या इंडियामधील (INDIA) सहभागाबद्दल प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी महत्वाचे विधान केले आहे. 'इंडिया आघाडीसोबत जाण्यास इच्छुक आहे,' मात्र आपल्याला या बैठकीचे निमंत्रण नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

तसेच 'बिन बुलाये मेहमान म्हणून जाणार नाही, अशी आमची प्रथा नाही..' अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे. 'ही बैठक संपल्यानंतर शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) याबाबत स्पष्टिकरण देतील,' असेही ते म्हणाले.

Prakash Ambedkar News
Tadoba Online Booking: ताडोबाला जाणार आहात? वाचा ऑनलाईन बुकिंगबाबत न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

'एक देश एक निवडणूक' वर टीका...

दरम्यान, केंद्र सरकारच्या वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच एक देश एक निवडणूक या धोरणाबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आरएसएस, भाजप (BJP) आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा संविधानाशी संबंध नाही, संविधानाला त्यांचा विरोध असल्याने युनियन ऑफ स्टेटचा मतितार्थ त्यांना कळला नाही, असे म्हणत स्वतःची भूमिका या माध्यमातून लादण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com