
बूट घालण्यासाठी मुलाने बॉक्स उघडला आणि अचानक या बुटातून नाग निघाला हे पाहून मुलगा प्रचंड घाबरला. ही घटना नाशिकच्या पिंपळगावबसवंत येथे घडली आहे. याठिकाणी असणाऱ्या मुस्लीम गल्लीत सोहेल जमील शेखने नवीन बुट आणले होते. त्याने बुटाचा बॉक्स घरामध्येच ठेवला होता. या बुटाच्या बॉक्समध्ये नाग जाऊन बसला होता.
सकाळी या मुलाने बूट घालन्यासाठी बॉक्स उघडला तर त्यामधून त्याला एक वेगळाच आवाज आला. त्याने तो बॉक्स बंद केला. बुटामध्ये नाग लपून बसल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने याची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यांनी तात्काळ वन्यजीव रक्षक पिंटू पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्प मित्राला पाठवले. या सर्पमित्राने नागाला पकडले आणि वनविभाग हद्दीत सोडून दिले. या नागाचा व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
नाशिकच्या पिंपळगावबसवंत येथे जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे गटारासह नाल्याचे पाणी अनेक घरांमध्ये शिरले. गटारातून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यासोबत अनेक सरपटणारे प्राणी नागरी वस्तीमध्ये शिरले. अनेकांच्या घरामध्ये साप, विंचू, किडे, बेडूक या सारखे सरपटणारे प्राणी आले. या मुस्लीम गल्लीत सोहेल जमील शेख हा मुलगा राहतो. सोहेलचे घर नाल्याजवळ असल्याने त्याच्या घरात नाग शिरला.
हा नाग सोहेलने नुकताच विकत आणलेल्या बुटाच्या बॉक्समध्ये जाऊन बसला होता. आज सकाळी बूट घालण्यासाठी सोहेलने बॉक्स उचलला तेव्हा त्यामधून वेगळाच आवाज निघाला. यात नाग असल्याची खात्री होता त्याने तात्काळ वन्यजीव रक्षकाला फोन केला. या वन्यजीव रक्षकाने सर्पमित्राला पाठवून दिले. या सर्पमित्राने सोहेलच्या घरात असलेला बुटाचा बॉक्स बाहेर आणला आणि खोलला. तर त्यामध्ये असलेल्या बुटातून नाग बाहेर आला. सर्पमित्राने शिताफीने नागाला पकडले आणि वनविभाग हद्दीत सोडले. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.