Theft Viral Video:
Viral VideoSaam Tv

Viral Video: अरे देवा! चार तरुण स्कूटीवरून आले आणि दुकानाबाहेरचे दूध लंपास केले; घटना सीसीटीव्हीत कैद

Theft Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या चोरीमध्ये जे काही चोरी झालं आहे ते पाहिल्यानंतर तुम्हीही नक्की हैराण व्हाल.
Published on

Viral Cctv Footage: सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल, ते कधीच सांगता येत नाही.दर वेळी लाखोंच्या संख्येने व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतात.त्यात सध्या एका चोरीच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.ज्यात तुम्हाला जे घडतं ते पाहून धक्काच बसेल.सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

नेमके काय घडले?

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक स्कुटीवरुन काही तरुण येताना दिसत आहेत.जर पाहिले तर एका स्कुटीवर चार तरुण बसलेले आहेत.ते येतात आणि रस्त्याच्या बाजूला एका दुकाना बाहेर असलेल्या काही बास्केटमधून दुधाच्या पिशव्या येतात आणि तेथून पळ काढतात.तरुणांना चोरी करताना पाहून एक व्यक्ती त्यांना पकडण्यासाठी बाहेर पळत येतो मात्र तो पर्यंत ते तरुण पळ काढतात.सर्व घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

@gharkekalesh या अकाउंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''कर्नाटकात, चार मुले स्कूटरवरून आली आणि दुकानाबाहेर ठेवलेल्या दुधाच्या पिशव्या चोरल्या''अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.व्हिडिओला लोकांनी हजारो लाईक्स आणि लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले.

व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट केली आहे,''काय रे देवा काय म्हणाव'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे,''मुद्दाम केलं असेल''तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''तरुणाईला काय झालं आहे''तर काही यूजर्संनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Theft Viral Video:
Shocking Video : महसूल अधिकाऱ्याचा प्रताप; चिमुकला चालवतोय गाडी, बाप करतो रील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com