...या व्हिडिओत कावळा चोचीतून बंडल घेऊन येताना दिसतोय...आणि हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय...कावळ्याने चोचीत पकडून नोटांचं बंडल आणलं आणि खिडकीत ठेवलंय...यावेळी एक व्यक्ती ते बंडल घेतो...पण, खरंच या कावळ्याने कुणाकडून 500 रुपयांचं बंडल आणलंय का...? हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने अनेक सवाल उपस्थित होतायत...
कावळा चोचीत 500 रुपयांच्या नोटांचे बंडल घेऊन येताना आणि खाली ठेवताना दिसतोय...हा अद्भूत नजारा पाहून अनेक जण थक्क झालेत...कावळ्याच्या चोचीत नोटांचे बंडल दिसते, तर पुढच्याच सेकंदाला चोच रिकामी होऊन अचानक माणसाचा हात दिसतो...पण, खरंच कावळ्याने एवढं नोटांचं वजन उचललं का...? एककावळ्याचे वजन अंदाजे 250 ग्रॅम असते, तर नोटांचे बंडल चोचीत धरून उडणे पक्ष्यासाठी तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का...? यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
कावळ्याचा व्हायरल व्हिडिओ पूर्णपणे बनावट
कावळ्याने 500च्या नोटांचं बंडल चोचीतून आणलं नाही
व्हिडिओ कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि VFX द्वारे बनवला
हा व्हिडिओ बनवण्यात आला असून, अशा कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या आणि बनावट व्हिडिओंवर विश्वास ठेवू नका...कारण, तुमची दिशाभूल करण्यासाठी असे व्हिडिओ व्हायरल केले जातात...आणि असे व्हिडिओ पाहून काहीजण शेअर करतात...त्यामुळे आमच्या पडताळणीत कावळ्याने नोटांचं बंडल आणल्याचा दावा असत्य ठरला..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.