Fact Check: बॉयफ्रेंड भाड्यानं मिळणार? जेवढे पैसे तेवढा वेळ मिळणार बॉयफ्रेंड?

Fake ‘Boyfriend Rental’ Packages Circulating Online: आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आता बॉयफ्रेंड भाड्याने मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय...तसा मेसेज व्हायरल करण्यात आलाय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात..
VIRAL BOYFRIEND ON RENT SCAM EXPOSED
VIRAL BOYFRIEND ON RENT SCAM EXPOSEDsaam tv
Published On

आता भाड्यानेही बॉयफ्रेंड मिळणार आहे...होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल करण्यात आलाय...सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल केलं जातंय...त्यामध्ये तासांचं भाडंही देण्यात आलंय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? कायद्याने बॉयफ्रेंड भाड्याने देण्याला परवानगी आहे का...? असे सवाल यामुळे उपस्थित होतायत...त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

भाड्याने आता बॉयफ्रेंड मिळणार आहे. वेळ घालवण्यासाठी काही तासाचे पैसेही घेतले जाणार आहेत. सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल केला जातोय...त्यामध्ये काही रेटही दाखवण्यात आलेयत...

बॉयफ्रेंड भाड्याने देण्याचे चार्ज?

कॉफी मीटिंग 499 रुपये

मुव्ही डेट 1249 रुपये

शॉपिंगसाठी वेळ 1499 रुपये

इव्हेंट्स 1999 रुपये

अर्धा दिवस 2999 रुपये

पूर्ण दिवस 4499 रुपये

असे काही रेट्सही देण्यात आलेयत...पण, याला परवानगी आहे का...? असे बॉयफ्रेंड भाड्याने घेऊन गैरप्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण?...भाड्याने बॉयफ्रेंड देणाऱ्यांनी परवानगी घेतलीय का...? सुरक्षेची हमी दिली जाते का...? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत...हा विषय गंभीर आहे...सध्या जेन जी अशा सोशल मीडियावरील जाहिरातींकडे आकर्षित होतात...त्यामुळे याचं सत्य सांगणं गरजेचं आहे...आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...हे खरं आहे का...? हे आम्ही सजाणून घेतलं...

भाड्याने बॉयफ्रेंडच्या ऑफर्सपासून सावध राहा

भाड्याने बॉयफ्रेंड मिळण्याच्या नावाखाली फसवणूक

सायबर गुन्हेगारांकडून महिलांना आकर्षक ऑफर्सचं आमिष

अॅडव्हान्स पेमेंट, बुकिंगच्या नावाने पैसे उकळतात

मोबाईल नंबर आणि फोटो मिळवून ब्लॅकमेलचा धंदा

भाड्याने बॉयफ्रेंड देण्याच्या नावाखाली हा फसवणुकीचा प्रकार आहे...सायबर गुन्हेगार महिलांना आकर्षक ऑफर्स देऊन आमिष दाखवतात...नंतर अॅडव्हान्स पेमेंट, सुरक्षा ठेव किंवा बुकिंगच्या नावाखाली त्यांची फसवणूक करून पैसे उकळतात...गुन्हेगारांकडून लोकांची फसवणूक आणि ब्लॅकमेल करण्यासाठी वापरली जाणारी एक पद्धत आहे...त्यामुळे अशा डेटिंग ट्रॅपमध्ये फसू नका...आमच्या पडताळणीत बॉयफ्रेंड भाड्याने मिळणार असल्याचा दावा असत्य ठरलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com