मुंबई पोलिसांचा हटके अंदाज! 'ऑरा फार्मिंग' वर केला भन्नाट डान्स; व्हिडिओ तुफान व्हायरल

Mumbai Police Aura Farming Video: सध्या व्हायरल असलेल्या ऑरा फार्मिंग डान्स ट्रेंडमध्ये आता मुंबई पोलिसांनीही उडी घेतली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. तुम्हीही हा व्हिडिओ एकदा पाहाच.
Mumbai Police Aura Farming Video
Saam Tv
Published On

Boat Dance Boy: सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ धुमाकूळ घालतो आहे. या व्हिडीओत एक लहान मुलगा अनोख्या आणि उत्साही पद्धतीने डान्स करताना दिसतो. त्याचे हालचाली, हावभाव, आणि पोझ इतक्या वेगळ्या आणि लक्षवेधी आहेत की पाहणारा क्षणभर स्तब्ध होतो. या डान्सला 'ऑरा फार्मिंग डान्स' असं नाव देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, हा डान्स केवळ स्टेजवरचा एक परफॉर्मन्स नाही, तर एक पारंपरिक बोट रेस दरम्यान केलेली कलाकृती आहे.

रायन हा इंडोनेशियातील रियाऊ या प्रांतातल्या एका लहानशा गावात राहणारा मुलगा. जिथे ना झगमगती स्टेजेस, ना महागडे कॉस्च्यूम्स.मात्र आहे ते आत्मविश्वासाने भरलेली उभी ठेवण आणि जबरदस्त स्टाइल. तो अगदी शांत चेहऱ्याने, काळा पारंपरिक पोशाख आणि डार्क गॉगल घालून बोट रेसच्या टोकावर उभा राहतो आणि डान्स सुरू करतो. त्याचे हाताचे ठसकेबाज हालचाली, अचूक कोअरिओग्राफीसारखा प्रभाव, आणि एकही चेहऱ्यावरचा भाव न बदलता केलेली सादरीकरण या सर्व गोष्टींनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

पाकु जलुर' बोट रेस – परंपरेतून जन्मलेली कला

रायन जिथे डान्स करत होता, तो प्रसंग म्हणजे 'पाकु जलुर' नावाची पारंपरिक बोट रेस. ही रेस इंडोनेशियातील शतकानुशतकालीन परंपरा मानली जाते. लांब लाकडी बोटींमध्ये अनेक खेळाडू बसून पाण्यावर रेस करतात आणि या रेसमध्ये एक खास कलाकार ‘टोगक लुआन’ या भूमिकेत असतो. तो बोटीच्या पुढच्या टोकावर उभा राहून, विविध हालचाली करून टीमला प्रोत्साहन देतो, आणि बघणाऱ्यांना मनोरंजनही.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला ऑरा फार्मिंग हा डान्स ट्रेंड जगभर गाजत आहे. या अनोख्या डान्सने सर्वांचं लक्ष वेधलं असतानाच आता मुंबई पोलिसांनीही या ट्रेंडमध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यांनी चिमुकल्या रायनप्रमाणेच डान्स करत एक भन्नाट व्हिडीओ(Video) सादर केला आहे. हा व्हिडीओ tv1indialive या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, अपलोड होताच काही तासांतच व्हिडिओने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. हजारो लाईक्स आणि लाखो व्ह्यूज मिळवत मुंबई पोलिसांचा हा हटके अंदाज नेटिझन्सना प्रचंड भावला आहे. लोकांनी या क्रिएटिव्ह व्हर्जनचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Mumbai Police Aura Farming Video
आता काय म्हणावं? तुमच्या आवडीचा गोड पदार्थ कुत्र्याने फस्त केला, व्हिडिओ पाहून जाईल मिठाई खाण्याची इच्छा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com