Shocking News Noida: इन्स्टाग्राम पोस्टवरून वाद; तरुणाला गुंडांनी थारने उडवलं; भीषण घटना कॅमेऱ्यात कैद

Noida Thar Viral Video: सोशल मीडियावर सध्या नोएडामधील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे एका तरुणाला थारने उडवण्यात आले आहे.नक्की काय घडले आणि कशावरुन घडले ते व्हिडिओत पाहा.
 Noida Thar Viral Video
Shocking News NoidaSaam Tv
Published On

Noida Thar Video: उत्तर प्रदेशमधील नोएडामध्ये एका इन्स्टाग्राम पोस्टवरून वाद पेटला आणि त्यातून भीषण हाणामारी झाली. काही गुंडांनी तरुणाला आधी हाणले मग थेट थार गाडीने जोरदार हल्ला केला. हा प्रकार अचानक घडला आणि घटनास्थळावर खळबळ उडाली. भीषण हल्ल्याचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यात तरुणावर गुंडांनी किती क्रूरपणे हल्ला केला ते स्पष्ट दिसते.

व्हायरल(Noida Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक तरुण रस्त्याने चालत येताना दिसत आहे. अचानक एक थार येते आणि तरुणाला जोरदार उडवते. थारने दिलेल्या धडकेत तरुण उडून बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडतो. सर्व थरार त्याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

या सर्व घटनेचा व्हिडिओ परिसरातील नागरिकाने मोबाईलमध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला आहे. परंतू, आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या पोलिसांनी सदर प्रकरणाचा गंभीरपणे विचार करून तक्रार नोंदवली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. घडलेली ही घटना नोएडाच्या सेक्टर २४ किंवा २५ मधील असल्याचे सांगिलतले जात आहे.

हा व्हिडिओ(VIDEO) सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला पाहून प्रत्येकाने प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''भयानक प्रकार आहे'' दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''पोलिसांनी लवकर कारवाई करावी'' तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली की,''सोशल मीडियावर वारंवार भयानक प्रकार पाहण्यासाठी मिळत आहेत'',अशा विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

 Noida Thar Viral Video
Girls Fight: अर्रर्र खतरनाक...! तरुणींमध्ये जोरदार झटापट, एकमेकींना जमिनीवर ओढत केली जबर धुलाई; नागरिकही थक्क

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com