Viral News: रस्त्यावर फिरताना सापडला काचेचा तुकडा, व्यक्तीचं काही दिवसात नशिबच बदललं

US Viral News: कधी कोणाचे नशीब चमकेल हे सांगता येणार नाही. जर तुम्हाला अचानक लाखो रुपयांची लॉटरी लागली आयुष्यच बदलून जाईन. असंच काहीसं अमेरिकेत राहणाऱ्या जेरी इंवास नावाच्या एका व्यक्तीसोबत घडले आहे.
Viral News
Viral NewsSaam Tv
Published On

US Man Find Diamond In Park :

कधी कोणाचे नशीब चमकेल हे सांगता येणार नाही. जर तुम्हाला अचानक लाखो रुपयांची लॉटरी लागली आयुष्यच बदलून जाईन. असंच काहीसं अमेरिकेत राहणाऱ्या जेरी इंवास नावाच्या एका व्यक्तीसोबत घडले आहे. इंवासला ध्यानीमनी नसताना एका पार्कमध्ये लाखो रुपयांचा हिरा सापडला आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, इवांस एका मैत्रिणीसोबत पार्कमध्ये फिरायला गेला होता. पार्कमध्ये शिरताच तिच्या पायाजवळ एक काचेचा तुकडा दिसला. त्याने तो काचेचा तुकडा खिशात ठेवला आणि घरी आणला. घरी आल्यावर इंवासला सारखा त्या काचेच्या तुकड्याचा विचार येत राहिला. त्याने हा तुकडा अमेरिकेच्या जेमोलॉजिकल इन्स्स्टिट्यूटमध्ये तो काचेचा तुकडा तपासण्यास दिला. तपासात हा तुकडा काचेचा नसून हिरा असल्याचे समजले. (Viral News)

Viral News
Husband Dance Video: बायकोसाठी कायपण! लग्नमंडपात नवरदेवानं बायकोसाठी केलं असं काही; सर्वजण लोटपोट हसू लागले

याबाबत जेरी इंवासने एका मुलाखतीत सांगितले की, त्या दिवशी पार्कमधील प्रत्येक वस्तू आम्ही घेतली होती. आम्हाला यातील अनेक गोष्टी हिरा असल्याचे वाटत होते. त्यामुळेच त्यांनी काचेचा तुकडा उचलला होता. परंतु हा काचेचा तुकडा खूप जास्त चमकत होता. त्यामुळेच आम्ही तो तपासण्यास दिला. त्यावेळी हा काचेचा तुकडा नसून तो हिरा असल्याचे समजले. हा तुकडा हिरा असल्याचे समजल्यावर आम्हाला खूप आनंद झाला .

अर्कांसस पार्क, विरासर आणि पर्यटन विभागनुसार, हा हिरा ४.८७ कॅरेटचा आहे. याआधीही अमेरिकेत केविन किनार्ड नावाच्या एका व्यक्तीला गार्डनमध्ये चमकणारा काचेचा तुकडा सापडला होता. तो तुकडा तपासला असता तो ९.०७ कॅरेटचा हिरा असल्याचे समजले. मागील ४८ वर्षात दुसरा सर्वात मोठा हिरा सापडला असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.

Viral News
Viral:भारत-पाकिस्तानमध्ये कोणती सीमा? विद्यार्थ्यांचं उत्तर वाचून मास्तरही चक्रावले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com