India vs South Africa
India vs South AfricaTwitter

India vs South Africa: बोलँड पार्क मैदानात संजू सॅमसनची बॅट तळपली; टीम इंडियाचं दक्षिण आफ्रिकेसमोर 297 धावांचं आव्हान

India vs South Africa 3rd odi match: सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाच्या फलंदाजांनी दमदार बॅटिग केली. या सामन्यात संजू सॅमसनच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 297 धावांचं आव्हान दिलं आहे.
Published on

IND vs SA:

भारत आणि दक्षिण आफ्रिकेत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी 'करो या मरो' सामना आहे. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेतील बोलँड पार्क मैदानात सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाच्या फलंदाजांनी दमदार बॅटिग केली. या सामन्यात संजू सॅमसनच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 297 धावांचं आव्हान दिलं आहे. (Latest Marathi News)

मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुलच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरली आहे. या सामन्यात ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे खेळत नाही. तर रजत पाटीदारने या एकदिवसीय सामन्यातून डेब्यू केलं आहे. कुलदीपच्या जागी वॉशिंग्टन सुंदर खेळत आहे.

India vs South Africa
Sakshi Malik Retired: डोळ्यात अश्रू..न्याय मिळण्याची आस...ऑलिम्पिक पदकविजेत्या साक्षी मलिकचा कुस्ती सोडण्याचा निर्णय

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला पहिला धक्का पहिल्या ५ षटकात बसला. पहिलाच सामना खेळताना रजत पाटीदार १६ चेंडूत २२ धावा केल्यानंतर बाद झाला. भारताने पहिल्या पॉवरप्लेमध्ये २ गडी गमावून ५९ धावा केल्या. कर्णधार केएल राहुलने ३५ चेंडूत २१ धावा केल्या. तिलकने संजूच्या मदतीने चौथ्या विकेटसाठी शतकीय भागीदारी रचली.

India vs South Africa
Tushar Deshpande Marriage: सीएसकेचा शिलेदार विवाहबंधनात! कल्याणमध्ये गर्लफ्रेंडसोबत अडकला लग्नाच्या बेडीत

तिलक आणि संजू सॅमसनने ११६ धावांची भागीदारी रचली. तिलकने ७७ चेंडूत ५२ धावा करून बाद झाला. तर संजू सॅमसनने १०८ धावा केल्या. रिंकू सिंहने २७ चेंडूत ३८ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने १४ धावा केल्या. भारताने संजू सॅमसनच्या शतकाच्या जोरावर ५० षटकात ८ गडी गमावून २९६ धावा केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com