Fight For Ac Room: बापरे! AC रुमवरुन राडा; माहेरच्यांनी सासरच्या मंडळींना केली बेदम मारहाण.. धक्कादायक VIDEO

सुनेच्या संतापलेल्या आई-वडिलांनी सासरच्या मंडळींना मारहाण केली. याचाच व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
Fight For Ac Room Viral Video
Fight For Ac Room Viral VideoSaamtv
Published On: 

Viral Video News: सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये अनेकदा जोरदार फॅमिली ड्रामा पाहायला मिळतो. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये अगदी शुल्लक कारणावरुन दोन कुटूंबामध्ये भररस्त्यात जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओमागची कथा, चला जाणून घेवू.

Fight For Ac Room Viral Video
Nanded News : शेतात कामाला गेलेले ३५ जण अडकले पुरात; जेसीबीच्या सहाय्याने काढले बाहेर

कुटूंबातील वाद सोशल मीडियापर्यंत पोहोचण्याचा प्रकार काही नवीन नाही. सोशल मीडियावर (Social Media) अनेक कौटूंबिक भांडणाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. एका शब्दावरुन सुरू झालेला हा वाद अनेकदा हाणामारीपर्यंत पोहोचण्याचेही अनेक प्रकार आत्तापर्यंत पाहिले असतील.

सध्या असाच एका कौटुंबिक भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल होत आहे. हा वाद हॉस्पीटलमध्ये गरोदर सुनेसाठी एसी रुम बुक न केल्याने झाल्याचे म्हटले जात आहे. यावेळी सुनेच्या संतापलेल्या आई-वडिलांनी सासरच्या मंडळींना मारहाण केली. याचाच व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Fight For Ac Room Viral Video
Nanded News : शेतात कामाला गेलेले ३५ जण अडकले पुरात; जेसीबीच्या सहाय्याने काढले बाहेर

समोर आलेल्या माहितीनुसार, सुनेची डिलिव्हरी सिव्हिल लाइन्स येथील खासगी हॉस्पिटलमध्ये झाली होती, पण फैजुल्लागंज येथे राहणाऱ्या सुनेसाठी सासरच्या मंडळींनी एसी रूम बुक न केल्याचा राग आल्याने तिच्या आई-वडिलांनी सासरच्या लोकांना म्हणजे सासू, ननंद आणि सासऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केली, याप्रकरणी आता पोलीस तपास करत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com