Delhi Metro Video : आधी बाचाबाची अन् शिवीगाळ नंतर थेट कुटाकुटी; दिल्ली मेट्रोत दोन महिलांची जोरदार हाणामारी, पाहा VIDEO

Two Women Fighting in Delhi Metro : दिल्ली मेट्रोत गोंधळ करणाऱ्या व्यक्तींना DMRC कडून कारवाईचा इशारा दिलेला आहे. मात्र तरीही प्रवाशांचा दिल्ली मेट्रोमधील गोंधळ पूर्णत: मिटलेला नाही.
Delhi Metro Video
Delhi Metro Video Saam TV

दिल्ली मेट्रो आणि व्हायरल व्हिडिओ असं जणू एक समिकरणच बनलं आहे. गेल्या काही दिवसांत दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सतत हाणामारी, कपल्स रोमान्स अशा सर्व गोष्टींचे व्हिडिओ दिल्ली मेट्रोत व्हायरल होत असतात. यावर DMRC कडून कारवाईचा इशारा दिलेला आहे. मात्र तरीही प्रवाशांचा दिल्ली मेट्रोमधील गोंधळ पूर्णत: मिटलेला नाही.

Delhi Metro Video
Amravati Accident : अमरावतीत हिट अँड रनचा थरार; सुसाट कारने दुचाकीस्वाराला चिरडलं; अपघाताचा भयानक VIDEO

अशात नुकताच दिल्ली मेट्रोमधील हाणामारीचा आणखी एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन महिला एकमेकींना धक्का लागल्याच्या कारणावरून भांडत आहेत. दोघींच्या भांडणामुळे येथील अन्य प्रवाशांना देखील त्रास होत आहे. काही प्रवासी त्या दोघींनाही शांत राहण्यास सांगत आहेत. मात्र दोन्ही महिलांची ही भांडणं थांबण्याऐवजी आणखी वाढत चालली आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दिल्ली मेट्रो यातील गर्दीमुळे पूर्ण भरली आहे. गर्दी म्हटल्यावर एकमेकांना धक्का लागणं सहाजिकच आहे. असाच एका मुलीचा धक्का महिलेला लागला. त्यावर ही महिला त्या मुलीशी थेट अरेरावीच्या भाषेत बोलत भांडू लागली. त्यावर या दोघींमध्ये आधी वाद नंतर शिवीगाळ आणि हाणामारी देखील झाली आहे.

दोघींनी एकमेकींच्या कानशीलात लगावली आहे. आता या महिला लेडीज नाही तर जनरल कोच मध्ये आहेत. जनरल कोचमध्ये फार गर्दी आणि माणसं देखील उभी आहेत. चुकून या महिलेला त्या मुलीऐवजी एखाद्या माणसाचा धक्का लागला आसता तर? असा प्रश्न सुद्धा व्हिडिओ पाहताना मनात येत आहे.

उपस्थित व्यक्ती त्यांना म्हणज आहेत की, दोघीही शिकलेल्या आणि सुशीक्षित आहात त्यामुळे भांडण थांबवा. मात्र तरिही महिलांची भांडणं थांबता-थांबत नाहीये. सोशल मीडियावर @Gharkekalesh या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखोंच्या घरात लाईक्स मिळालेत. महिलांच्या हाणामारीचा हा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होत आहे.

Delhi Metro Video
Couple Viral Video: अरे जरा तरी भान ठेवा रे! हायवेवर धावत्या दुचाकीवर बॉयफ्रेंडला मिठी मारून बसली तरुणी, पोलिसांनी पाहिलं अन्...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com