Amravati Accident : अमरावतीत हिट अँड रनचा थरार; सुसाट कारने दुचाकीस्वाराला चिरडलं; अपघाताचा भयानक VIDEO

Amravati Accident Shocking Video : अमरावतीत सुसाट कारने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
अमरावतीत हिट अँड रनचा थरार; सुसाट कारने दुचाकीस्वाराला चिरडलं
Amravati Accident Shocking VideoSaam TV

पुणे शहरात घडलेल्या हिट अँड रनच्या घटनेनं अख्ख्या देश हादरला. अल्पवयीन मुलाने दारू पिऊन सुसाट कार चालवत तरुण-तरुणीला चिरडलं. ही घटना ताजी असतानाच अमरावती शहरातही अशाच प्रकारची घटना घडली. भरधाव कारने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

अमरावतीत हिट अँड रनचा थरार; सुसाट कारने दुचाकीस्वाराला चिरडलं
Akola Crime News: अकोला हादरलं! टीव्ही पाहायला शेजारी गेलेल्या ६ वर्षीय मुलीवर अत्याचार

२३ दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरली असून संताप व्यक्त केला जात आहे. भीमसेन वाहने असं मृत व्यक्तीचं नाव आहे. अपघातानंतर कारचालक पसार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातील किशोर नगर येथील रहिवासी भीमसेन वाहने कामानिमित्त दुचाकीवरून बाहेगावी निघाले होते. कठोरा रोडवरील संमती कॉलनीतून ते आले असता, विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता, की भीमसेन कारच्या चाकाखाली आले. अपघातानंतर कारमधून काही व्यक्ती उतरले आणि घटनास्थळावरून पसार झाले.अपघातानंतर स्थानिकांनी भीमसेन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.

मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेला २३ दिवस उलटून गेले तरी आरोपी अद्याप सापडलेला नाही. पोलिसांनी तातडीने त्याचा शोध घेऊन योग्य कारवाई करावी, अशी विनंती मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी केली आहे.

अमरावतीत हिट अँड रनचा थरार; सुसाट कारने दुचाकीस्वाराला चिरडलं
Sindhudurg Boat Accident: वेंगुर्ले बंदरात बोट उलटून मोठी दुर्घटना! चारही खलाश्यांचे मृतदेह सापडले; शोधमोहिम थांबली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com