Akola Crime News: अकोला हादरलं! टीव्ही पाहायला शेजारी गेलेल्या ६ वर्षीय मुलीवर अत्याचार

Physically Abused Minor Girl: अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
६ वर्षीय मुलीवर अत्याचार
Akola Crime NewsSaam Tv

अक्षय गवळी, साम टीव्ही अकोला

अकोल्यात सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुर तालुक्यातल्या माना पोलीस स्टेशन हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. सहा वर्षीय चिमुकली ही शेजारच्या घरात टीव्ही पाहण्यासाठी गेली होती. तेव्हा घरात कोणी नसल्यानं संधी साधत २० वर्षीय तरुणांनं तिच्यासोबत अमानुषपणे कृत्य करीत अत्याचार केला आहे.

माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना (Akola Crime News) आहे. या घटनेनं अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे. माना पोलिसांनी या प्रकरणात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केला आहे. चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम तरुणालाही गजाआड केलंय. अकोल्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळातंय. मूर्तिजापुर तालुक्यात २० वर्षीय तरूणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलाय.

माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूरज सुरोशे यांनी दिलेल्या माहितीनूसार, ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही सहा वर्षीय चिमुकली (Physically Abused Minor Girl) ही २३ मे रोजी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास गावातील आरोपी तरूणाच्या घरी टीव्ही पाहायला गेली होती. त्यावेळेस आरोपी तरुणानं चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मुलगी घरी परतली असता, तिने घडलेला हा प्रकार तिच्या आईवडिलांना सांगितला.

६ वर्षीय मुलीवर अत्याचार
Akola Crime News: अकोल्यात सावकाराची दादागिरी; शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न, धक्कादायक VIDEO व्हायरल

घडलेला प्रकार ऐकून तिच्या आई-वडिलांना धक्का बसला. त्यांनी तातडीने माना पोलीस स्टेशन (Mana Police Station Area) गाठलं. दिलेल्या तक्रारीवरू कलम ३७६ पोस्कोअंतर्गत (बाल संरक्षण कायद्या अंतर्गत) ३ आणि ४ नुसार गुन्हा दाखल केला आबे. दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे, हे कृत्य केल्यानंतर आरोपी पळून जाण्याचा तयारीत (crime news) होता. पोलिसांनी तात्काळ तासभरात गुन्हा दाखल करत राहत्या घरातून तरुणाला अटक केली आहे तरुणाला न्यायालयासमोर हजर केलं असता त्याला तिन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सूरज सुरोशे करत आहेत.

६ वर्षीय मुलीवर अत्याचार
Mumbai Crime News: दीड वर्षाच्या चिमुकल्याची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला; निर्दयी पत्नी-पत्नीला अटक, मुंबईतील संतापजनक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com