Delhi Viral Video: बसमध्ये सीटवरुन दे दणादण! महिलांमध्ये जुंपली; एकमेकींच्या झिंज्या उपटल्या| VIDEO व्हायरल

Delhi Bus Viral Video: दिल्लीच्या (Delhi) बसमधील असून सीटवरुन दोन महिलांमध्ये जोरदार जुंपल्याचे दिसत आहे. बसमधील इतर प्रवासी त्यांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र दोघीही थांबायचे नाव घेत नाहीत.
Delhi Bus Viral Video:
Delhi Bus Viral Video: Saamtv

Women Fighting Viral Video:

सोशल मीडिया म्हणजे असंख्य व्हिडिओंचा खजिना. सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी थरकाप उडवणारे अपघात, दे दणादण मारामारी तर कधी जबरदस्त डान्सचे हे व्हिडिओ नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये बसमधील सीटवर बसण्यावरुन दोन महिलांमध्ये जोरदार राडा झाल्याचे दिसत आहे.

सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. जगाच्या कोपऱ्यात झालेली कोणतीही घटना एका क्षणात सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचते.  सोशल मीडियावर (Social Media) भांडणाचेही (Fighting Video) अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या बसमधील दोन महिलांच्या मारामारीचा व्हिडि तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडिओ दिल्लीच्या (Delhi) बसमधील असून सीटवरुन दोन महिलांमध्ये जोरदार जुंपल्याचे दिसत आहे. बसमधील इतर प्रवासी त्यांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र दोघीही थांबायचे नाव घेत नाहीत. अखेर एक महिला मध्यस्थी करते अन् दोघीही शांत होतात. या भांडणाचा संपूर्ण घटनाक्रम एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

Delhi Bus Viral Video:
Chandrakant Patil Accident: मोठी बातमी! मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात

व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, दोघी महिला एकमेंकांचे केस पकडून भांडण अन् मारामारी करताना दिसत आहेत. Delhi Roads problems या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या दोन्ही महिलांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तर काही जणांनी पुरूषांची मारामारी असती तर आत्तापर्यंत नक्की कारवाई झाली असती, असेही म्हटले आहे. थोडक्यात महिलांच्या या तुफान मारामारीने नेटकरीही अवाक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Delhi Bus Viral Video:
Maharashtra Sadan Scam: महाराष्ट्र सदन घोटाळा: ४ याचिकांवर स्वतंत्र सुनावणी होणार, छगन भुजबळांच्या अडचणी वाढल्या?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com