
Couple Dance: रिल्सची क्रेझ सध्या प्रत्येकामध्ये प्रचंड वाढलेली आहे. सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवण्यासाठी काहीजण अत्यंत हटके व्हिडिओ बनवतात आणि त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शूटिंग केलं जातं.मात्र, या रील्स करण्याच्या मोहात अनेकदा स्वतःच्या आणि इतरांच्या जिवाशी खेळ केला जातो. सध्या असंच काहीसं अमरावती शहरात पाहायला मिळालं.
अमरावती शहरात भर उन्हात देविदास इंगोले या व्यक्तीने अमरावती शहरातील पंचवटी आणि राजकमल चौकात दोन रिल्स (Reels)स्टारचा धुमाकूळ बघायला मिळाला, भर रस्त्यात रिल्ससाठी व्हिडिओ बनवला यावेळी दोन्ही बाजूने ट्राफिक लागलं असताना दोन रिल्सस्टार मात्र बेधडकपणे खुलेआम नाचत होते.
यावेळी त्यांच्या जवळून गाड्या जात होत्या तरी देखील ते दोघे हटले नाही. त्यामुळे या दोघांना वाहतूक पोलिसांनी का रोखले नाही हा प्रश्न आता सोशल मीडियावर लोक उपस्थित करत आहे,लाईकच्या नादात जीव धोक्यात घालणे योग्य आहे का? त्यामुळे अशा रस्त्यावर रील्स बनवणाऱ्यांना पोलीस धडा शिकवणार का? यांच्यावर कारवाई होणार का हा सवाल नेटकरी विचारत आहे.
सध्या हा व्हिडिओ (Video) युट्युबवरील saamtv या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ अपलोड करण्यासोबत कॅप्शनमध्ये,''अमरावतीत भर रस्त्यात शूट केली रिल; वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष'', असे लिहिण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर यापूर्वीही अनेर रील्स व्हिडिओ पाहिले. ज्यात काहींनी जीव गमवावा लागला तर काहींना गंभीर दुखापती ही झाल्या.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.