
Unique Love Stor: सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही घटना एखाद्या टीव्ही सिरियलच्या कथेला लाजवेल अशी आहे. एक महिला थेट आपल्या चार मुलांना घेऊन थेट प्रियकरासोबत फरार झाली. ती एवढ्यावरच थांबली नाही, तर थेट आग्रा गाठून ताजमहालसमोर आपल्या प्रेमीबरोबर एक रोमँटिक रिल शूट केली आणि तीच रिल तिच्या पतीला पाठवली.
व्हायरल (Viral) होत असलेली ही घटना उत्तर प्रदेशमधील असल्याचे समजते. ज्यात घडले असे की, महिलेचा पती त्याच्या आईसोबत जवळच्या नातेवाईकांच्या लग्नात गेला होता. चालून असलेल्या संधीचा महिलेने फायदा घेतला आणि आपल्या चार मुलांना घेऊन प्रियकरासोबत फरार झाली. पतीला सर्व समजावे त्यासाठी ताजमहलवर जाऊन रिल व्हिडिओ शूट केला आणि नवऱ्याला पाठवला.
लग्नकार्य आटपून नवरा आणि सासू घरी आली, त्याला वाटल बायको गरमा गरम चहा घेऊन येईल. मात्र, तिथे काय? घरात कोणीही नाही आणि मोबाईलवर एक नोटिफिकेशन आलं आणि ज्यात महिलेने पळून जाऊन प्रियकरासोबत बनवलेली रिल्स व्हिडिओ पाठवली. नवऱ्याने तो रिल व्हिडिओ पाहिला आणि डोक्यावर हात मारुन घेतला.
सध्या हा व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटिझन्स या घटनेवर भन्नाट मीम्स आणि कमेंट्स करत आहेत. काही लोकांना याला ''हे नवीन प्रकारचं ‘फॅमिली ड्रामा’ वाटतंय'' असं म्हणत आहे तर काहींनी म्हटलं की, 'आता या कथेचा पुढचा एपिसोड काय असेल'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप: महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.