Viral Video: धाराशिवच्या शेतकऱ्याचा नाद करायचा नाय; मुलाच्या लग्नात थेट हेलीकॉप्टरने मिरवणूक

Helicopter Baraat Video: सोशल मीडियावर तुम्हाला कधी काय पाहण्यासाठी मिळेल सांगता येत नाही. नुकताच एक असा व्हिडिओ व्हायरल झाला ते पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झालेला आहे. व्हायरल व्हिडिओ एका लग्नामधील आहे.
Helicopter Baraat Video
Viral VideoSaam Tv
Published On

Osmanabad Wedding Video: हल्लीच्या काळात लग्न समारंभात वैविध्य आणि वैभव दाखवण्यासाठी बरेचजण हटके गोष्टी करत असतात. परंतु, धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने हौस म्हणून मुलाच्या लग्नाची मिरवणूक थेट हेलिकॉप्टरने काढलीय. सोशल मीडियावर मिरवणूकीतील व्हिडिओ तुफान व्हायरल झालेला आहे.

वरात आली थेट आकाशातून!

धाराशिवच्या भूम तालुक्यातील अंतरवली गावातील शेतकरी भास्कर शिकेतोड या शेतकऱ्यांनी मुलाच्या लग्नासाठी(Weeding) गावात थेट हेलीकाॅप्टरच आणला. शिकेतोड यांचा मुलगा आकाश आणि अस्मीता या दोघांचा विवाह काल पार पडला लग्नात नवरदेवाची मिरवणूक थेट हेलीकॉप्टरने काढण्यात आली.

भास्कर शिकेतोड यांनी त्यांच्या मोठ्या मुलाच्या लग्नात ही हेलीकॉप्टरमधुन मिरवणूक काढली होती. भास्कर शिकेतोड यांच्या स्वतःच्या लग्नात त्यांची मिरवणूक मोटारसायकलवरुन काढण्यात आली होती. मात्र, मुलांच्या लग्नात हेलीकॉप्टरने मिरवणूक काढायची असं शेतकरी शिकेतोड यांनी ठरवल होत.

शेतकऱ्याची स्टाईल बघून सगळे म्हणाले...

हा व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने म्हटलं आहे,''शेतकऱ्याला कमी नका समजू रॉयल शेतकरी'' दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे,''नाद करायचा नाय'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Helicopter Baraat Video
Viral Video: ऐन लग्नातच गर्लफ्रेंडचा राडा! सर्वांसमोर नवरीला केली मारहाण, नंतर पाहुण्यांनी तरुणीला धोपटलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com