Viral Video: वैष्णो देवीच्या त्रिकुट पर्वतावर वीज कोसळली, घटना कॅमेऱ्यात कैद

Lightning strikes Video: सोशल मीडीयावर सध्या एक अनोखा व्हिडिओ तुफान चर्चेत आलेला आहे. ज्यामध्ये तुम्हाला एका पर्वातावर झालेली अनोखी घटनेचा पाहण्यास मिळेल. हा व्हिडिओ एकदा पाहाच.
Lightning strikes Vide
Viral VideoSaam Tv
Published On

Jammu and Kashmir: जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथील त्रिकुटा पर्वतावर नुकताच एक अप्रतिम आणि थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. काही दिवसांपूर्वी, अचानक हवामानात झालेला बदल आणि तुफान वाऱ्यांसह मुसळधार पाऊस यामुळे, या पर्वतावर वीज कोसळली, ज्याचे अद्भुत दृश्य एका भक्ताच्या कॅमेऱ्यात टिपले गेले आहे. हे दृश्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून, त्याचे अनोखे आकर्षण सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे.

कटरा जे कि त्रिकुटा पर्वताचा एक प्रमुख प्रवेशद्वार आहे. हे स्थळ धार्मिकतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. येथूनच तीर्थयात्रेचा प्रारंभ होते, जिथे हजारो भक्त दरवर्षी देवी वैष्णो देवीच्या दर्शनासाठी येतात. अशातच अचानक वादळाचे आगमन झाले. वादळात गडगडाट, कडकडाट आणि विजेचा प्रहार यातून एक नवा अध्याय सुरू झाला.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ फेसबूकवर अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ जगभरातील लाखो लोकांनी पाहिला असून त्यावर शेकडो लाईक्स मिळाहे आहेत आणि हजारो लाईक्सही मिळालेले आहे. त्यानंतर हा व्हिडिओ नेटकऱ्यांनी इन्स्टाग्राम, ट्वीटर आणि अनेक ग्रुपवप शेअर केलेला आहे.

नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया

व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''निसर्गाची एक अद्भुत किमया'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''खुप सुंदर'' अजून एका यूजरने कमेंट केली,''पहिल्यांदा असं पाहिले'' अशा अनेक आश्चर्यकारक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Lightning strikes Vide
Viral Video: लग्न कार्यात वादळाचं थैमान! लग्नाचा मंडप हवेत उडाला; पाहुण्यांची एकच धावपळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com