Parbhani News: राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सून दाखल झाला आहे. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह सरी कोसळल्यात. अशात या पावसाने एका लग्नात नवरा-नवरी आणि वऱ्हाडी यांची चांगलीच तारांबळ उडाली. भर लग्नात दुपारच्या वेळी सोसाट्याचा वारा सुटला आणि लग्नमंडप उडू लागला. (Latets Marathi News)
वऱ्हाडींनी धरून ठेवला मंडप
वादळी वाऱ्यामुळे मंडप उडून जात असताना विवाहानिमित्त जमलेल्या वऱ्हाडींना मंडप धरून ठेवण्याची वेळ आली. मानवत तालुक्यातील आटोळा गावात पंडित व भाले या परिवाराचा लग्न सोहळा येथे आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त दोन्ही परिवाराकडील नातेवाईक मंडळी जमले होते. मात्र काल दुपारी अचानक वादळी वारे सुरु झाले अन बघता बघता लग्न मंडप उडू लागला. अखेर उपस्थित नातेवाईक वऱ्हाडी मंडळीना मंडप धरून ठेवावा लागला. त्यामुळे काही काळ लग्न समारंभात मोठा अडथळा निर्माण झाला होता.
वादळवारा येईल याची कुणालाही काहीच कल्पना नव्हती. नवरा-नवरी दोघेही मस्त तयार होऊन आले होते. दोघांना सुखी संसाराचा आशीर्वाद देण्यासाठी वऱ्हाडीही उपस्थित होते. अशात लग्नात दुपारच्या वेळी जेवण सुरु असताना अचानक सोसाट्याचा वारा आला आणि मंडप हवेत उडू लागला. उपस्थित सर्वच व्यक्तींची यावेळी पळापळ झाली. काहींना लग्नमंडप धरून ठेवण्याची वेळ आली.
काही वेळाने वादळ शांत झाले. वादळ सुरु असेपर्यंत वऱ्ह्याड्यांनी मंडप धरून ठेवला होता. वादळ थांबल्यावर उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला. तसेत आनंदात दोघांचा विवाहसोहळा पार पडला. गेल्या २ ते ३ दिवसांपासून वादळवाऱ्याने मंडप उडाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परभणी, वाशीम आणि बुलढाणा येथे देखील लग्न मंडप उडाल्याच्या घटना घडल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.