School Bus Viral Video: चिमुकला बसच्या दरवाजात अडकला; चालकाने तब्बल १००० फूट फरफटत नेलं अन्...

School Bus Video: लहानमुलांना डोळ्यात तेल घालून संभाळावे लागते.
School Bus Viral Video
School Bus Viral VideoSaam TV

Viral Video: शाळकरी लहान मुलांना घरातून शाळेत जाण्यासाठी बसची सुविधा सर्वच शहरांमध्ये उपलब्ध आहे. शाळेतील बसचे आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी असलेल्या या बसमध्ये वाहनचालकाला वेगळं असं ट्रेनिंग दिलं जातं. मात्र तरी देखील शाळकरी बसचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजात धडकी भरेल. प्रत्येक शहरात शाळकरी बसमध्ये ड्रायव्हरसह मुलांना बसमधून खाली उतरवण्यासाठी आणि पुन्हा त्यांना बसमध्ये व्यवस्थित सोडण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केली जाते. लहानमुलांना डोळ्यात तेल घालून संभाळावे लागते. थोडंही दुर्लक्ष झालं तरी मोठा अनर्थ होण्याची शक्यता असते.

School Bus Viral Video
Pune Crime News: अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांकडून अत्याचार; धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं

समोर आलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक लहान शाळकरी चिमुकला आपल्या बसमधून घरी जात असतो. त्याचं स्टॉप आल्यावर बस तेथे थांबते. चिमुकला आपलं दप्तर घेऊन खाली उतरतो. तो खाली उतरल्याबरोबर बसचे दार बंद होते अन् मोठा अनर्थ घडतो.

बसचे दार बंद होताच चिमुकल्याची बॅग बसच्या दारात अडकते. बॅग आतमध्ये आडकल्याने चिमुकला देखील आतमध्ये फसतो. चिमुकला जेव्हा बसमध्ये फसतो तेव्हा वाहन चालकाला बसचे दार बंद होऊन चिमुकला आतमध्ये अडकल्याचे समजत नाही. बस सुरू होते आणि तब्बल १००० फुटांपर्यंत बस पुढे जाते.

School Bus Viral Video
Sangli Crime News: सांगली हादरली! अल्पवयीन मुलीचं भररस्त्यात अपहरण, अत्याचार करत धारदार शस्त्राने वार

यावेळी बॅग आतमध्ये अडकल्याने चिमुकला रस्त्यावर फरफटत जातो. सदर घटनेचा व्हिडिओ साल २०१५ मधील आहे. @crazyclipsonly या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. चिमुकला आतमध्ये अडकून फरफटत असल्याचं बसमध्येच बसलेल्या एका महिलेच्या लक्षात येतं. त्यावेळी तातडीने बस थांबवून चिमुकल्याला रुग्णालयात नेलं जातं.

व्हिडिओ (Video) पाहून सर्वच नेटकरी यावर संताप व्यक्त करत आहेत. आठ वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ आता पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. पालकांनी आपल्या मुलांची स्वत: काळजी घ्यायला हवी. तसेच वाहनचालकांनी देखील लहान मुलांना बसमधून घेऊन जाताना योग्य ती काळजील घेतलील पाहिजे, अशा कमेंटही नेटकऱ्यांनी यावर केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com