Pune News: पाहावं ते नवल! खेड तालुक्यात रंगते देव-दानवांच्या युद्धाची थरारक यात्रा; पहा VIDEO

Pune Khed News: तुम्ही कधी देव दानवांचे युद्ध पाहिले आहे का?, सध्या सोशल मीडियावर असाच एका यात्रेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Viral News
Viral VideoSaam Tv
Published On

Khed News: देव दानवांच्या युद्धाच्या अनेक कथा लहानपणापासुनच आपण ऐकत आलोय आज असाच एक देवदानवांचं युद्धाची दोन दिवसीय यात्रा उत्सव खेड तालुक्यातील कोयाळी गावात रंगलीय. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यात्रेत नेमके असते तरी काय?

डोल ताशांचा गजर, भानोबाच्या नावाचं चांगभलं आणि हातात काठ्या घेतलेला हा जमाव अचानक द्वेशाने देवाच्या अंगावर धाऊन जातो आणि क्षणातच अनेकजण धडधडा खाली कोसळत जातात हि दृश्य कोणत्या राजकिय राड्याची नाही तर कोणत्या अँक्शन पिचर मधली नाही हि दृश्य आहे खेड तालुक्यातील कोयाळी गावातील भानोबा यात्रेची,या गावात दोन दिवस रंगते ते देव दानवांचे युद्ध .

महाराष्ट्राच्या विविध भागातुन आलेले हजारो भाविक या यात्रेत सहभागी होतात भानोबाचा मुखवटा हातात घेऊन हा उत्सव सुरु होतो भानोबा जन्मस्थान मंदीरापासुन मिरवणुक निघते मंदीरातील समोरील पटांगणात मातंग रोमोशी तस्कर हातात काठ्या घेऊन जमलेले असतात यावेळी एक विडा दिला जातो हा विडा स्विकारताच तस्करांच्या अंगात युद्धाचा अविश्कार संचारतो आणि हे दानव धडाधडा कोसळतात भोनेबाच्या यात्रेतील हे देवदानव युद्ध हि या भाविकांची श्रद्धा आहे मात्र या युद्धाची कहाणी थरारक आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral News
Ganga Jal Viral Video : हरिद्वारमधून गंगाजल आणलं, ४ दिवसांनी मायक्रोस्कोपमध्ये बघितल्यानंतर आश्चर्याचा धक्काच बसला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com