
आजकाल सोशल मीडियावर अनेक गोष्टींचा ट्रेंड सुरु आहे. यामध्ये सध्या भारतात विविध गोष्टी मायक्रोस्कोप खाली पाहण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. या ट्रेंडमध्ये लोकं खाण्या-पिण्याच्या गोष्टीचं निरीक्षण करतात. यामध्ये आपल्या साध्या डोळ्यांना जे दिसत नाही ते या मायक्रोस्कोपच्या माध्यमातून पाहता येतात. या ट्रेंडमध्ये एका व्यक्तीने गंगेच्या पाण्याचं निरीक्षण केलं आहे.
गंगा नदी ही भारतातील सर्वात पवित्र नदी मानली जातं आणि हिंदू संस्कृतीत तिला आईचा दर्जा दिला आहे. गंगेमध्ये सगळी पापं धुतली जातात असंही म्हटलं जातं. दरम्यान गंगेच्या पाण्याबद्दल अशी समजूत आहे की, इतक्या वर्षांनंतरही त्याचे पाणी खराब होत नाही. मात्र त्याच्या शुद्धतेबाबत वाद सुरू असून आता या एका व्हिडिओने गंगेचं पाणी किती शुद्ध आहे हे दिसून येतंय.
गंगेच्या पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी या व्यक्तीने हरिद्वारहून पाणी भरलं होतं. यावेळी त्याने वाहणाऱ्या गंगा नदीच्या पाण्याचा नमुना घेतला होता. यानंतर, त्या व्यक्तीने पहिल्यांदा घरातील मायक्रोस्कोपद्वारे नमुना पाहिला.
ज्यावेळी त्याने निकाल पाहिला तेव्हा त्याचा विश्वास बसला नाही. यानंतर त्याने एका मोठ्या हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेत पॉवरफुल मायक्रोस्कोपच्या लेन्सखाली नमुना तपासला. याचा निकाल देखील आश्चर्यकारक होता.
साधारणपणे, ज्यावेळी सूक्ष्मदर्शकाद्वारे नदीचं पाणी पाहिलं जाते तेव्हा त्यात अनेक प्रकारचे जंतू आणि जीवाणू दिसतात. तसंच या पाण्याचं सेवन केल्याने हे जंतू शरीरात प्रवेश करतात. पण ज्यावेळी त्या व्यक्तीने आपल्या घरी सूक्ष्मदर्शकाखाली गंगाजल ठेवलं तेव्हा एक आश्चर्यकारक रिझल्ट दिसला. या पाण्यात कोणतेही जीवाणू किंवा जंतू नव्हते. यानंतर त्या व्यक्तीने हॉस्पिटलच्या पॉवरफुल लेन्सद्वारे गंगाजलाची तपासणी केली.
जेव्हा त्या व्यक्तीने हॉस्पिटलच्या पॉवरफुल लेन्सच्या माध्यमातून गंगाजल तपासलं त्यावेळी तज्ज्ञांनाही त्यात काहीच दिसलं नाही. त्यानंतर हे पाणी चार दिवस तसंच ठेवण्यात आलं. चार दिवसांनंतरही नमुन्याची तपासणी केली असता त्यात एकही जंतू दिसला नाही.
दरम्यान प्रयोगशाळेतील तज्ज्ञांच्या मते, हे पाणी पिणंही शक्य आहे. म्हणजेच गंगेचे पाणी शुद्ध आहे आणि कधीही दुषित नाही, हे खोटे नाही तर अगदी खरं आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी याला गंगेच्या पाण्याचा महिमा म्हणतायत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.