

Viral Resignation Letter By Using Food Items: नोकरी करत असताना विविध कारणांमुळे जॉब सोडण्याची, दुसऱ्या कंपनीत जाण्याची वेळ प्रत्येकावर येते. अशावेळी सर्वात महत्वाचा आणि टेंन्शन वाढवणारा मुद्दा म्हणजे राजीनामा. अनेकजण हा राजीनामा देताना आपल्या सहकाऱ्यांचे कंपनीचे कौतुक करत असतात.
तर काही जण कंपनीवर राग व्यक्त करुन मोकळे होतात. मात्र सध्या एका सुंदर राजीनाम्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. असा जबरदस्त राजीनामा तयार करणाऱ्या या तरुणाचे नेटकऱ्यांनी चांगलेच कौतुक केले आहे. (Viral Story In Marathi)
राजीनाम्याची तुफान चर्चा...
सोशल मीडियावर आपल्याला अनेक प्रकारचे व्हायरल (Viral Video) व्हिडिओ आणि फोटो पाहायला मिळतात. या व्हायरल व्हिडिओ आणि फोटोंमागची कथा इतकी रंजक असते की नेटकऱ्यांमध्ये ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतात. सध्या सोशल मीडियावर एका राजीनाम्याचीही अशीच तुफान चर्चा पाहायला मिळत आहे.
जबरदस्त क्रिएटीव्हिटी...
हा राजीनामा देणाऱ्या व्यक्तीने अशी काही जबरदस्त क्रिएटीव्हिटी वापरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत की प्रत्येकजण त्याच्या या कल्पकतेला दाद देताना पाहायला मिळत आहे. या तरुणाने आपल्या राजीनामा पत्रात थेट खाण्यापिण्याच्या वस्तू चिकटवत आपल्या भावना मांडल्या आहेत.
अशा व्यक्त केल्या भावना...
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की राजीनामा देणाऱ्या व्यक्तीने आपल्या भावना शब्दांऐवजी त्या ठिकाणी प्रसिद्ध कॅडबरी चिकटवत व्यक्त केल्या आहेत. ५ स्टार, गुड डे बिस्कीट, पर्क अशा विविध कॅडबऱ्या आणि चॉकलेट्स, बिस्कीटांचा वापर करत अतिशय सुंदर वाक्यरचना केली आहे, ज्याला खरोखर दाद द्यावी लागेल.
नेटकऱ्यांनी केले कौतुक...
हे रेजिग्रेशन लेटर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचे जोरदार कौतुक केले आहे. अनेकांनी त्याच्या भावनांचे कौतुक केले आहे, तर काही जणांनी तरुणाच्या या कल्पकतेला सलाम केला आहे. आतापर्यंत ९१ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी हे पत्र वाचले असून सर्वांनीच या कर्मचाऱ्याच्या हुशारीचं कौतुक केले आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.