भयंकर! चिमुकलीवर चालता चालता अचानक भटक्या कुत्र्यांचा हल्ला; VIDEO पाहून हादरुन जाल

Stray Dog Attack: कर्नाटकातील एका परिसरात भटक्या कुत्र्यांनी चालत असलेल्या चिमुकलीवर अचानक हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडीओ पाहून लोक सुन्न झाले आहेत.
Stray Dog Attack
Moment captured on CCTV when stray dogs attacked a little girl walking alone in Karnataka’s Koppal districtSaam Tv
Published On

Karnataka Incident: एक भयावह आणि मन हेलावून टाकणारी घटना कर्नाटक राज्यातील एका जिल्ह्यात घडली आहे. जिथे एख चिमुरडी रस्त्याने शांतपणे चालत असताना अचानक काही भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला असून, सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हा व्हायरल(Viral) व्हिडीओ पाहून कोणीही हादरेल. एका निष्पाप चिमुकलीवर चालता चालता जे काही घडलं, ते कोणत्याही संवेदनशील व्यक्तीच्या काळजाला चटका लावणारे आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

व्हिडिओमध्ये दिसणारी चिमुकली रस्त्याच्या कडेला शांतपणे चालत असताना दिसत आहे. अचानक चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. कुत्र्यांनी मुलीला चावण्याचा प्रयत्न करत तिच्यावर उड्या मारल्या. ती घाबरून पळू लागली, पण कुत्र्यांनी तिला वेढून चावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चिमुकलीने शेवटी कुत्र्यांना पळवून लावले.

घटनेचा व्हिडीओ व्हायरल, लोकांमध्ये संताप

या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही(Cctv) फुटेज समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी प्रशासनाच्या ढिसाळतेवर टीका केली आहे.तर काहींनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Stray Dog Attack
गाव हादरलं! जनावरांच्या गोठ्यात सापाच्या पिल्लांचा सापळा; एकाच ठिकाणी आढळली ६० नागाची पिल्लं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com