Lightning Video: ढगांचा गडगडाट अन् अंगाचा थरकाप; वीज कोसळताना कॅमेऱ्यात कैद, थरारक VIDEO व्हायरल

Solapur Rain News: सोलापूरमध्ये वीज पडतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय. सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वीज पडतानाचा व्हिडिओ
Lightning VideoSaam Tv

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही सोलापूर

सोलापूरमध्ये अवकाळी पावसानं थैमान मांडलं आहे. विजांच्या कडकडाटात अन् ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. आता सोलापूर जिल्ह्यातून वीज पडतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. मोहोळ तालुक्यातील खंडाळी गावात वीज पडतानाचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ढगांच्या गडगडाटासह वीज कोसळताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहताना अंगाचा थरकापच उडतो.

पाऊस सुरू असताना अचानक मोठा आवाज होतो आणि समोर असलेल्या झाडांजवळ वीज कोसळताना दिसत आहे. यामुळे परिसरात चांगलेच हादरे बसल्याचं जाणवत आहे. सोलापूरमधील (Lightning Video) वीज पडतानाचं दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे. वीज कोसळतानाचा थरारक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. काळजात धडकी भरवणारा हा व्हिडिओ (Viral News) आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पावसात अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली (Solapur Rain News) आहे. यावेळी पावसाचे शूटिंग घेताना वीज पडतानाचं लाईव्ह दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.वीज पडतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

वीज पडतानाचा व्हिडिओ
Maharashtra Rain Update: राज्यभरात अवकाळी पावसाचं थैमान, वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळली; अनेक ठिकाणी घरांची पडझड

सोलापूर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले आहे. मोहोळ तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे. मोहोळ तालुक्यात वादळी वारे आणि पावसाच्या तडाख्यात फळबागा भुईसपाट झाल्या (Lightning Video Viral) आहेत. अनेक ठिकाणी वाऱ्यांमुळे घरांचे पत्रे उडाले आहेत. सोलापूरात वादळी वारे आणि मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी वीज पडून लोकांचा आणि जनावरांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

वीज पडतानाचा व्हिडिओ
Mumbai Rain: मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होणार; शहरात हलक्या पावसाच्या सरी बरसणार, हवामान विभागानं काय सांगितलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com