Soan papdi Memes: काजुकतली, गुलाबजामचं स्वप्न पाहिलं...; दिवाळी गिफ्टमध्ये मिळाली सोनपापडी, मिम्स VIDEO व्हायरल

Soan papdi Memes: भेटवस्तू ही प्रत्येकाला हवी हवी वाटणारी असते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण यासाठी लहान होऊन जातो.
Soan papdi Memes
Soan papdi MemesSAAM DIGITAL
Published On

Soan papdi Memes

भेटवस्तू ही प्रत्येकाला हवी हवी वाटणारी असते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण यासाठी लहान होऊन जातो. सर्वत्र चागंल्या क्षणी जवळच्या व्यक्तीस भेटवस्तू दिली जाते. सध्या सर्वांच्या आवडीचा दिवाळी हा सणजवळ येत आहे. सध्या घरोघरी जोरदार तयारी सुरु आहे. रंगीबेरंगी पणत्या, आकाशकंदील तसेच घराची सजावट करण्यापासून ते जवळच्यांना भेटवस्तू देण्यापासूनची तयारी सुरु आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Soan papdi Memes
Ind vs Pak Memes: 'आमच्या पप्पांनी पाकिस्तान हाणला..',भारत- पाक सामन्यानंतर भन्नाट मीम्स व्हायरल

भेटवस्तु निवडणे ही बाब दिसते तेवढी तेवढा सोप्पा नसते. नेमकी भेट म्हणून जवळच्या व्यक्तीला काय द्यावे हे कळत नाही. भेटवस्तूमध्ये जास्त करुन मिठाईचे पदार्थं दिले जातात. त्यात कधी काजूकतली असते किंवा सोनपापडी असते.पण सोनपापडीचे नाव घेताच अनेकांची तोंड वाकडी होतात. पण भारतात सोनपापडी अन् दिवाळी याचे समिकरण गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळतात.

सणासुदीमध्ये आपल्याला भेटवस्तू काय मिळणार हे जाणून घ्यायची इच्छा असते. पण वर्ष भरापासून मेहनत केलेल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी एक असा सण असतो. त्यावेळी ऑफीसकडून चांगली भेटवस्तू मिळण्याची अपेक्षा असते. पण मुळात त्यांना मिळते ती 'सोनपापडी'.

अलीकडे सोन पापडी आणि त्यावरील मिम्स हे नेटकऱ्यांसाठी विनोदाचा भाग बनला आहे. व्हायरल होत असलेल्या सोनपापडी मीम्समध्ये वेगवेगळ्या मुव्हीचे डायलॉग आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक वेगवेगळ्या कल्पनांनी सोन पापडी मिम्स, जोक्स व्हायरल होत असतात. सोशल मीडिया एक्सवरील अनेक अकाउंटवरुन वेगवेगळ्या सोन पापडी मिम्स व्हायरल होत आहेत. त्यामधील @porterit_या अकाउंटवरुन सोन पापडी मिम्स व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या सोन पापडी मिम्स, जोस्कवर नेटकऱ्यांनी जोरादार प्रतिक्रिया आल्या आहेत. तसंच हे मिम्स मोठ्या प्रमाणात शेअर ही होत आहेत.

Soan papdi Memes
India vs Pakistan Memes: 'शेजारऱ्यांचे TV वाचले..', भारत- पाकिस्तान सामन्यानंतर भन्नाट मीम्स व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com