Vishal Gangurde
सर्वात आधी खोलगट कढईत मैदा घ्या. त्यात मीठ आणि पीठ साखर घाला. त्यानंतर योग्य अंदाजानुसार तूप किंवा तेल घ्या.
कढईतील मिश्रण चांगले एकजीव करा. त्यानंतर योग्य अंदाजानुसार दूध घाला. पुन्हा थोडंफार एकजीव करून घ्या.
आता पीठ चांगले एकजीव करून मळून घ्या. पुढे १०-१५ मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवा.
त्यानंतर कढईमध्ये तूप किंवा तेल घालून कढई गॅसवर गरम करायला ठेवा.
शंकरपाळीच्या पीठाचे गोळे बनवून घ्या. त्यानंतर गोळा लाटून घ्या. पुढे सुरीच्या मदतीने शंकरपाळी कापून घ्या.
कापलेल्या शंकरपाळीचे तुकडे कढईमध्ये गरम तेलात किंवा तूपात तळून घ्या.
सोनेरी रंग येईपर्यंत शंकरपाळी खरपूस पद्धतीने तळून घ्या.
तुमची खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी शंकरपाळी तयार आहे.