Snake Video
Snake VideoSaam TV

Snake Video: झोपेत तरुणाच्या जीन्समध्ये शिरला साप अन्...; थरारक VIDEO व्हायरल

Viral Video: धक्कादायक बाब म्हणजे पँट जिथे फाटली आहे तेथून या सापाने रस्ता शोधलाय आणि साप थेट या माणसाच्या पँटमध्ये शिरला आहे. पुढे या माणसाचं काय होतं. साप त्याला दंश करतो का?
Published on

Snake News:

साप म्हणजे अत्यंत विषारी प्राणी. सापाचं विष अंगात भीनल की माणूस जागीच मृत्यू वापतो. सापाचे काळजात धडकी भरवणारे आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अशात सध्या सोशल मीडियावर सापाचा एक अतिशय भयंकर व्हिडिओ समोर आला आहे.

Snake Video
Snake Viral Video: बापरे बाप! बेडरुममध्ये आढळले ४ साप; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण झोपेत आहे. जमिनीवर तो पालथा झोपला आहे. अशात या तरुणाने घातलेली जीन्स देखील थोडी फाटली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जीन्स जिथे फाटली आहे तेथून या सापाने रस्ता शोधलाय आणि साप थेट या माणसाच्या जीन्समध्ये शिरला आहे. पुढे या माणसाचं काय होतं. साप त्याला दंश करतो का? असे अनेक प्रश्न मनात येत आहेत.

मात्र व्हिडिओ अर्धवट असल्याने पुढे काय झालं हे समजू शकलेलं नाही. @india.yatra या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी यावर विविध कमेंट केल्या आहेत. अशावेळी व्हिडिओ काढण्यापेक्षा त्या व्यक्तीची आधी मदत करणे गरजेचं आहे असंही एकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल किंवा फेमस होण्यासाठी आजकाल व्यक्ती पूर्णतः फोनमध्ये आणि विशेषतः कॅमेऱ्यात गुंतलेल्या पाहायला मिळतात. एखाद्या व्यक्तीचा जीव जात असेल ती व्यक्ती कोणत्या अडचणीत असेल तर मदत करण्याऐवजी त्या व्यक्तीचा आधी व्हिडीओ काढत असतात. सदर व्हिडीओवर काहींनी हास्यास्पद कमेंट केल्यात तर काहींनी संताप व्यक्त केला आहे.

विषारी प्राणी मग ते साप असो अथवा अन्य कोणत्याही प्रणयाच्या जीवाशी खेळ करणे चुकीचे आहे. काल मुंबईमधून अशीच एक घटना समोर आली होती. एका हायक्लास सोसायटीमध्ये एका महिलेने किंग कोब्रा सापाला मारलं होतं. त्यामुळे महीले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Snake Video
Crime News: प्रेमविवाह केल्याने भाऊ संतापला, बहिणीचं अख्खं कुटुंबच संपवलं; भयानक घटनेनं खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com