Viral Video News: छोटीशी चूक जिवावर बेतली! जळती सिगारेट खड्ड्यात टाकली अन् झाला भीषण स्फोट.. थरकाप उडवणारा व्हिडिओ

Shoking Viral Video: रस्त्यावरुन जाताना तरुणाने केलेल्या एका चुकीमुळे भीषण स्फोट झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Shoking Viral Video:
Shoking Viral Video:Saamtv
Published On: 

Viral Video News: सोशल मीडियावर आपल्याला असंख्य व्हायरल व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हिडिओ कधी पोटधरुन हसायला लावतात तर कधी काळजाचा थरकाप उडवतात. सध्या अशाच एका भयंकर घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. रस्त्यावरुन जाताना तरुणाने केलेल्या एका चुकीमुळे भीषण स्फोट झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घेवूया सविस्तर...(Viral Video News In Marathi)

Shoking Viral Video:
Maharashtra Political News : नरेंद्र मोदी हे राहुल गांधींना घाबरतात; काँग्रेस नेत्यांचा निशाणा

वाहन चालवताना, रस्त्यावरुन चालताना आपण केलेली एक चूक अनेकदा जीवावर बेतू शकते. अनेकजण असे प्रकार करुन स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात घालत असतात. सध्या असाच एक भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये तरुणाला त्याची एक चूक चांगल्याचे महागात पडल्याचे दिसत आहे. रस्त्याने चालताना हातातील सिगारेट एका छिद्रामध्ये टाकल्याने भीषण स्फोट होतो. या अपघातात तरुण जबर जखमी झाला. हा व्हिडिओ २०१७ मधील असल्याचे सांगण्यात येत आहे.

Shoking Viral Video:
Pune Traffic Jam: पुण्यातील वाहतूक कोंडीत अडकली रुग्णवाहिका; जीव गेल्यास जबाबदार कोण?

व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एक तरुण रस्त्याने चालत आहे. चालता चालता तो एक ठिकाणी थांबतो. पुढच्याच क्षणी तो त्याच्या हातातील सिगारेट त्या छिद्रामध्ये टाकून देतो. मात्र त्याची हीच छोटीशी चूक महागात पडते आणि पुढच्याच सेकंदात एक भीषण स्फोट होतो.

स्फोटात तो तरुण जोरात उचलून जमिनीवर आदळल्याचे दिसत आहे. दुर्घटनेत तो इतका जबर जखमी होतो की त्याला चालताही येत नाही. स्फोटानंतर तो सरपटत पुढे सरकत असल्याचे व्हिडिओमध्य दिसत आहे.

या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही (CCTV Footage) कॅमेऱ्यात कैद झाला असून नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तरुणाला त्याच्या चुकीची शिक्षा मिळाल्याचे म्हणले आहे. तर काही जणांनी धुम्रपान धोकादायक असल्याचे सांगितले आहे. आत्तापर्यंत हा व्हिडिओ तब्बल ३ लाख, ७८ हजार जणांनी पाहिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.