Shocking Video: गाव हादरलं, काचा फुटल्या! 30 सेकंदात ३०० सिलेंडरचा स्फोट; थरारक व्हिडिओ आला समोर

Cylinder Blast Shocking Video: उत्तर प्रदेशमधून एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे. घडलेल्या घटनेची भीषणता इतकी जास्त आहे की संपूर्ण गावच हादरलं आहे. नक्की काय घडले ते व्हिडिओत पाहा.
Cylinder Blast Shocking Video
Shocking VideoSaam Tv
Published On

Uttar Pradesh Cylinder Blast: एकामागोमाग तब्बल 300 गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरले आहे. अवघ्या 30 सेकंदांत 40 जोरदार स्फोट झाले. ही उत्तर प्रदेशमधल्या भीषण घटना बरेलीतील महालक्ष्मी गॅस एजन्सीमध्ये घडली. सध्या या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

स्फोटानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आला आहे. यात जळणारे सिलेंडर हवेत उडताना दिसत आहेत. स्फोट (blast) इतका भीषण आहे की आगीचे मोठे मोठे लोट हवेत उडत आहेत. शिवाय सिलेंडर फुटण्याचा कर्णकर्कश आवाज आणि या धक्कादायक घटनेमुळे परिसरात उडालेली धांदल या सगळ्याचा थरार या व्हिडिओंमध्ये स्पष्ट दिसतो. वारंवार होत असलेले हे स्फोट पाहून प्रत्येकजण हैराण झालेला आहे.

नेमके घडले तरी काय?

पोलिसांच्या माहितीनुसार, गॅस एजन्सीच्या गोदामासमोर सिलेंडरने भरलेला ट्रक उभा होता. मात्र त्यानंतर अचानक ट्रकच्या केबिनला आग लागली आणि त्यावर लोड करण्यात आलेल्या तब्बल 300 सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत गोदाम आणि ट्रक संपूर्णत जळून खाक झाले आहेत.

स्फोटानंतर परिसरात भीतीचं वातावरण

झालेल्या भीषण स्फोटामुळे तेथील संपूर्ण परिसर हादरुन गेला होता. नागरिक घराबाहेर जाऊन काय घडलं ते पाहत होते. तर काही नागरिकांनी घाबरुन त्यांची दुकानं आणि घरं खाली केली. शिवाय अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसानाही झालं असून परिसरात विजेच्या तारा जळाल्यामुळे विद्युतपुरवठाही खंडित करण्यात आलेला आहे.

 उत्तर प्रदेशमधल्या घटनेचा व्हिडिओ(Video) सध्या इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर कॅप्शनमध्ये,''300 सिलेंडरच्या स्फोटाने उत्तर प्रदेश हादरलं!'' असे लिहिण्यात आलेले आहे. घटनेची भीषणता पाहिल्यानंतर अनेकांनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.

टीप: भीषण स्फोटाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Cylinder Blast Shocking Video
Vira Video: ट्रेन प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वीच ट्रेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांनी अनोख्या पद्धतीने पळवला जमाव, पाहा व्हायरल VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com