
उत्तरप्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका मृत महिलेच्या बँक खात्यात कोट्यावधी रूपये जमा झाले आहेत. जे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. सध्या हे बँक खाते बंद केले असून याबाबतची माहिती आयकर विभागाला दिली आहे.
उत्तरप्रदेशच्या ग्रेटेड नोएडा येथील दनकौर येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. जेथे या तरूणाच्या खात्यात १०,०१,३५,६०,००,००,००,००,०१,००,२३,५६,००,००,००,००,२९९ म्हणजेच १६ अंकी पैसे जमा झाले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
न्यूज फ्रि प्रेसच्या वृत्तानुसार, दीपक उर्फ असे या तरूणाचे नाव आहे. दीपकची आई गायत्रीदेवीचे दोन महिन्यापूर्वी निधन झाले आहे. आईचे बँक खाते मुलगा सध्या वापरत असून ३ ऑगस्टला रविवारी रात्री मोबाईलवर त्याला एक संदेश आला. ज्यामध्ये त्याच्या खात्यात १६ अंकी म्हणजेच १,१३,५६,००० कोटी रुपये जमा झाल्याचे दिसून आले. या माहितीमुळे त्याला धक्का बसला आणि त्याने तो संदेश त्याच्या जवळील मित्रांना पाठवला त्यांना देखील नेमके किती पैसे खात्यात जमा झाले आहेत हे तपासल्यानंतर त्यांना देखील धक्का बसला. ही बातमी सर्वानाच समजताच दीपकला मित्र- परिवार यांचे फोन येण्यास सुरूवात झाली. मात्र यामुळे दीपकने त्याचा फोन बंद ठेवला असल्याची माहिती आहे.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी दीपकने बँकेत जाऊन या विषयी चौकशी केली. बँक अधिकाऱ्यांनी त्याचे खाते तपासले. यानंतर त्याला हे खाते तात्काळ बंद करण्यास सांगितले आहे. बँकेने आयकर विभागाला याबाबतची माहिती दिली असून या संपूर्ण प्रकरणावर पुढील चौकशी सुरू आहे.
दीपकच्या आईचे दोन महिन्यापूर्वीच निधन झाल्याने त्याच्या खात्यात एवढी रक्क कशी जमा झाली आहे. याचा सध्या तपास सुरू आहे. आयकर विभागाने चौकशी सुरू केली आहे. दरम्यान हे प्रकरण बँक चूक, तांत्रिक बिघाड की मनी लॉड्रिंग खटला आहे का? याबाबत अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यामुळे एवढा मोठा व्यवहार नेमका कोणी केला? याबाबत तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.